Bigg Boss Marathi 6 : विशालसोबत तन्वी, दिपालीने हे काय केलं; प्रेक्षकांनी केली थेट घराबाहेर काढण्याची मागणी
- Published by:Priya Lad
Last Updated:
Bigg Boss Marathi 6 : बिग बॉस मराठी 6 च्या घरात आजवर विशालला बहुतेक प्रेक्षकांनी ट्रोल केलं आहे पण आता पहिल्यांदाच अनेक प्रेक्षकांनी त्याची बाजू घेतली आहे.
advertisement
1/7

बिग बॉस मराठी 6 च्या घरातील स्पर्धकांची लढत आता अधिकच चुरशीची होणार आहे. आतापर्यंत सगळे ग्रुपने खेळत होते पण आता इंडीव्ह्युजल गेम पाहिला जाणार आहे.
advertisement
2/7
याचदरम्यान सदस्यांना असे टास्क देण्यात येत आहेत, ज्यामुळे घरातील सदस्यांमधील दुरावा आता अधिकच वाढत चालला आहे.
advertisement
3/7
यामुळे घरातील सदस्यांबाबत आता प्रेक्षकांची मतंही बदलताना दिसत आहेत. आता घरात असं काही घडलं आहे, ज्यामुळे आजवर ट्रोल झालेल्या विशालला प्रेक्षकांचा आता फुल्ल सपोर्ट मिळताना दिसतो आहे.
advertisement
4/7
बिग बॉस मराठी 6 भाऊचा धक्काचा प्रोमो तुम्ही पाहू शकता ज्यात दिपाली आणि तन्वी एकत्र दिसत आहेत. त्यांच्या हातात एक काटेरी मुकूट देण्यात आला आहे.
advertisement
5/7
रितेश सांगतो हा काटेरी मुकूट अशा व्यक्तीला घालायचा आहे, जे स्वत:ला राजा समजतात. दिपाली आणि तन्वी दोघंही विशालचं नाव घेतात.
advertisement
6/7
मीपणाचा आणि अहंकाराचा राजा आहे, विशाल कोटियन... अशी घोषणा करत तन्वी आणि दिपाली विशालच्या डोक्यावर काटेरी मुकूट घालतात.
advertisement
7/7
विशाल हसत हे मुकूट स्वीकारतो पण नंतर तो हा अहंकार नाही तर स्वाभिमान आहे, असं म्हणत आपला राग व्यक्त करताना दिसतो. हा प्रोमो पाहिल्यानंतर अनेक प्रेक्षक विशालच्या समर्थनार्थ उतरले आहेत. विशालच खरा विजेता आहे, तो जिंकणार. तन्वी आणि दिपालीला घराबाहेर काढा अशी मागणीही एका प्रेक्षकांनी केली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Bigg Boss Marathi 6 : विशालसोबत तन्वी, दिपालीने हे काय केलं; प्रेक्षकांनी केली थेट घराबाहेर काढण्याची मागणी