TRENDING:

अखेर आदित्य धरची इच्छा पूर्ण! प्रसिद्ध दिग्दर्शकाच्या पत्नीची Dhurandhar 2 मध्ये एन्ट्री, कोण आहे 'ती' अभिनेत्री?

Last Updated:
आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंदर: द रिव्हेंज' चित्रपटात बॉलिवूड सेलिब्रिटींची मांदियाळी पाहायला मिळणार आहे. हा मल्टी स्टारर चित्रपट सध्या सोशल मीडियावर कमालीचा चर्चेत आला आहे. आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंदर: द रिव्हेंज' चित्रपटात रणवीर सिंगसह प्रमुख भूमिकेत, संजय दत्त, अर्जुन रामपाल, अक्षय खन्ना आणि आर. माधवन देखील आहेत. आता अशातच या यादीमध्ये एक प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दिसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
advertisement
1/7
आदित्य धरची इच्छा पूर्ण! प्रसिद्ध दिग्दर्शकाच्या पत्नीची 'धुरंदर 2'मध्ये एन्ट्री
आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंदर: द रिव्हेंज' चित्रपट सध्या सोशल मीडियावर कमालीचा चर्चेत आला आहे. नुकताच चित्रपटाचा टीझर सोशल मीडियावर रिलीज झाला आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये चित्रपटाची कमालीची चर्चा पाहायला मिळत आहे. अशातच सध्या सोशल मीडियावर चर्चा सुरू झालीये, ती चित्रपटामध्ये एका अभिनेत्रीची एन्ट्री होणार आहे.
advertisement
2/7
आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंदर: द रिव्हेंज' चित्रपटात रणवीर सिंगसह प्रमुख भूमिकेत, संजय दत्त, अर्जुन रामपाल, अक्षय खन्ना आणि आर. माधवन देखील आहेत. आता अशातच या यादीमध्ये एक प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दिसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मिडिया रिपोर्टनुसार, ती बॉलिवूड अभिनेत्री कॅमिओ करणार असल्याची चर्चा आहे. चित्रपटात तिचा छोटाच रोल असणार आहे.
advertisement
3/7
दिग्दर्शक आदित्य धर यांची चित्रपटाच्या पहिल्या भागामध्ये त्या अभिनेत्रीला चित्रपटात कॅमिओ करण्याची इच्छा अपूर्ण राहिली होती. आता तिच इच्छा दुसऱ्या भागात ते पूर्ण करणार आहेत. मात्र, अद्याप या गोष्टीची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणीही नसून, निर्माता- दिग्दर्शक आदित्य धर याची पत्नी आणि प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री यामी गौतमी आहे.
advertisement
4/7
मीडिया रिपोर्टनुसार, यामी गौतमीने आधीच पाच दिवसांचं शुटिंग पूर्ण केलेलं आहे. यामी गौतमी 'धुरंदर: द रिव्हेंज' चित्रपटामध्ये कॅमिओ करणार असल्याची चर्चा सुरू आहे. तिचा चित्रपटामध्ये एक छोटा रोल असणार आहे. पण तिची महत्त्वाची भूमिका असणार असून प्रेक्षकांवर मजबूत छाप सोडणारं पात्र तिचे असण्याची शक्यता आहे. नेमक्या कोणत्या पद्धतीचे तिचे पात्र असेल याची माहिती समोर आलेली नाही.
advertisement
5/7
पिंकव्हिलाला सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यामीची भूमिका ॲक्शनने भरलेली असणार असून जी कथेसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. तिने जवळजवळ पाच दिवस चित्रपटाचं शुटिंग पूर्ण केलं आहे. तिची जरीही एक छोटी भूमिका असली तरीही तिचा चित्रपटामध्ये एक महत्त्वाचा भाग आहे. जो प्रेक्षकांना आश्चर्यचकित करेल. यापूर्वी, यामीने आदित्य धरसोबत उरी: द सर्जिकल स्ट्राइक आणि आर्टिकल 370 मध्ये एकत्रित काम केले आहे.
advertisement
6/7
'धुरंदर: द रिव्हेंज' हा एक मल्टी- स्टारर चित्रपट असून चित्रपटामध्ये रणवीर सिंहसोबत संजय दत्त, आर. माधवन, सारा अर्जुन आणि अर्जुन रामपाल मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तसेच, अक्षय खन्नाने साकारलेल्या 'रहमान डकैत' भूमिकेची फ्लॅशबॅक स्टोरी चित्रपटात पाहायला मिळणार आहे. चित्रपटामध्ये अभिनेत्री यामी गौतमसोबत अभिनेता विकी कौशल सुद्धा कॅमिओच्या भूमिकेत दिसणार असल्याची चर्चा आहे.
advertisement
7/7
'धुरंधर'च्या पहिल्या भागाने बॉक्स ऑफिसवर 895 कोटींहून अधिकची कमाई तर, जगभरात जवळपास 1350 कोटींची कमाई केली. आता 'धुरंधर'चा सिक्वेल येत्या 19 मार्च 2026 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार असल्याची माहिती आहे. पहिल्या भागाच्या यशानंतर चित्रपटाचा सिक्वेल सुद्धा प्रचंड हिट होईल, यात शंका नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
अखेर आदित्य धरची इच्छा पूर्ण! प्रसिद्ध दिग्दर्शकाच्या पत्नीची Dhurandhar 2 मध्ये एन्ट्री, कोण आहे 'ती' अभिनेत्री?
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल