TRENDING:

Dhurandhar 2 Movie: रिलीजच्या आधीच 'धुरंदर: द रिव्हेंज'ची बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई, पेड प्रिमियरमध्ये केला करोडोंचा बिझनेस

Last Updated:
रणवीर सिंग आणि अक्षय खन्नाच्या 'धुरंदर: द रिव्हेंज' चित्रपटाची सध्या चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा होत आहे. रणवीरच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी म्हणता येईल. 'धुरंदर: द रिव्हेंज' चित्रपट बॉक्स ऑफिसवर रिलीजच्या आदल्या दिवशी रिलीज होणार आहे. पेड प्रिमियरमध्ये चित्रपटाने करोडोंचा बिझनेस केला आहे. फक्त देशातच नाही तर, परदेशातही चित्रपटाने जबरदस्त कमाई केलेली आहे.
advertisement
1/6
रिलीजच्या आधी 'धुरंदर 2'चे थिएटरमध्ये तुफान कलेक्शन, प्रिमियरमध्ये करोडोंची कमाई
आदित्य धर दिग्दर्शित, 'धुरंदर: द रिव्हेंज' चित्रपट सध्या कमालीचा चर्चेत आला आहे. अलीकडेच चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर रिलीज झाला आहे. ट्रेलर रिलीज होताच, चाहत्यांसह सेलिब्रिटीही चित्रपट पाहण्यासाठी कमालीचे आतुर आहेत. आता अशातच चित्रपटाच्या ॲडव्हान्स बुकिंगला सुरूवात झाली आहे.
advertisement
2/6
'धुरंदर: द रिव्हेंज' चित्रपट बॉक्स ऑफिसवर 19 मार्च रोजी रिलीज होत आहे. चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांकडून जोरदार ॲडव्हान्स बुकिंग सध्या सुरू आहे. फक्त भारतातच नाही तर, अमेरिकेतही चित्रपटाला प्रेक्षकांकडून दमदार प्रतिसाद मिळत आहे. ॲडव्हान्स बुकिंगमधून रणवीर सिंगच्या 'धुरंदर 2' ने किती कमाई केली आहे, जाणून घेऊया...
advertisement
3/6
'धुरंदर: द रिव्हेंज' चित्रपट बॉक्स ऑफिसवर 19 मार्चला रिलीज होणार आहे. परंतू हा चित्रपट प्रेक्षकांना 18 मार्चपासूनच पाहायला मिळणार आहे. कारण, 18 मार्चला निर्मात्यांकडून पेड प्रिमियर शोची घोषणा करण्यात आली आहे. चित्रपटाने आता पेड प्रिमियरमध्येच करोडोंची कमाई केलेली आहे.
advertisement
4/6
'धुरंदर: द रिव्हेंज' चित्रपटाने परदेशामध्ये ॲडव्हान्स बुकिंगच्या माध्यमातून जबरदस्त कमाई केलेली आहे. भारताआधी अमेरिकेमध्ये ॲडव्हान्स बुकिंगसाठी तिकिट बारी उघडली आहे. वँकी बॉक्स ऑफिसने दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेत 557 ठिकाणी 'धुरंदर 2' चित्रपटाला 1034 शोज मिळालेले आहेत.
advertisement
5/6
10 दिवस आधीच 'धुरंदर 2' चित्रपटाने 38 हजारांहून अधिकच्या तिकिटांची विक्री केली आहे. चित्रपटाने आतापर्यंत 5.71 कोटींची कमाई केलेली आहे. हा आकडा फक्त पेड प्रिमियर शोसाठी खरेदी केलेल्या तिकिटांच्या कमाईचा हा आकडा आहे. तर, चित्रपटाचे रिलीजच्या नंतर सुद्धा जबरदस्त तिकिट कमाई झालीये.
advertisement
6/6
'धुरंदर 2' चित्रपटाने फर्स्ट विकेंडला ॲडव्हान्स बुकिंगमध्ये 15.68 कोटींची कमाई केलेली आहे. सॅकल्निकने दिलेल्या माहितीनुसार, भारतामध्ये 'धुरंदर 2' चित्रपटाने तब्बल 18 कोटींची कमाई केलेली आहे. 19 मार्च 2026 रोजी रिलीज होणारा 'धुरंदर 2' चित्रपट हिंदी, तेलुगु, तामिळ, कन्नड आणि मल्याळम भाषेत रिलीज होणार आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Dhurandhar 2 Movie: रिलीजच्या आधीच 'धुरंदर: द रिव्हेंज'ची बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई, पेड प्रिमियरमध्ये केला करोडोंचा बिझनेस
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल