TRENDING:

Rashmika-Vijay Wedding : रश्मिका-विजयने केलं राजेशाही लग्न, पण बसला 60 कोटींचा फटका? नेमकं झालं काय?

Last Updated:
रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा यांनी उदयपूरमध्ये शाही थाटात लग्न केलं. लग्नादरम्यान त्यांचं 60 कोटींचं नुकसान झाल्याच्या चर्चा समोर येत आहेत. नेमकं प्रकरण काय आहे?
advertisement
1/8
रश्मिका-विजयने केलं राजेशाही लग्न, पण बसला 60 कोटींचा फटका? नेमकं झालं काय?
रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा यांच्या लग्नाची चर्चा सध्या सुरू आहे. दोघांनी 2 फेब्रुवारी रोजी उदयपूर येथे लग्न केलं. दोघांचं लग्न शाही थाटात झालं. लग्नासाठी त्यांनी तब्बस 12 ते 20 कोटी रुपयांपर्यंत खर्च केल्याची माहिती समोर आली आहे.  दरम्यान या सगळ्यात रश्मिका आणि विजय यांचं 60 कोटींचं नुकसान झाल्याची चर्चा सुरू झाली आहे. नेमकं नुकसान कशाचं झालं? या चर्चा खरंच खऱ्या आहेत का? पाहूयात.
advertisement
2/8
या दोन्ही स्टार्सची मैत्री रिलेशन 'गीता गोविंदम' या चित्रपटापासून सुरू झालं होतं.  त्यांच्या ऑनस्क्रीन केमिस्ट्रीचे प्रेक्षकांनी खूप कौतुक केले होते. त्यानंतर दोघेही डिअर कॉम्रेडमध्ये एकत्र दिसले. त्यानंतर त्यांच्या रिलेशनवर शिक्का मोर्तब झाला. पण त्यांनी तब्बल 9 वर्ष ही माहिती कोणालाही कळू दिली नाही. 
advertisement
3/8
रश्मिका आणि विजय यांनी लग्नात एकूण 3 किलो सोनं परिधान केलं होतं. रश्मिकानं 2 किलो सोनं आणि विजयने 1 किलो सोनं परिधान केलं. उदयपूरमध्ये दोघांनी मोठ्या राजेशाही थाटात लग्न केलं. डोक्याच्या केसांपासून पायांच्या नखापर्यंत दोघेही सोन्याने न्हाहून निघाले होते. 
advertisement
4/8
सध्या सोशल मीडियावर एक बातमी व्हायरल होत आहे की रश्मिका आणि विजय यांचं 60 कोटींचं नुकसान झालं.  नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मने विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदान्ना यांच्या लग्नाचे हक्क खरेदी करण्याची ऑफर दिली आहे. याबाबत अनेक तेलुगू न्यूजपोर्टलवर वृत्त देखील पाहायला मिळालं होतं. 
advertisement
5/8
 नेटफ्लिक्सने या जोडप्याच्या लग्नाच्या व्हिडिओचे हक्क खरेदी करण्यासाठी 60 कोटी रुपयांची ऑफर दिली आहे. दरम्यान या चर्चांवर सूत्रांचे म्हणणे आहे की ही बातमी पूर्णपणे अफवा आहे आणि त्यात काहीही तथ्य नाही. 
advertisement
6/8
नेटफ्लिक्स आणि रश्मिका-विजय यांनी कोणताही करार केलेला नाही. उलट त्यांनी त्यांचं लग्न मीडियापासून दूर ठेवलं. त्यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोंशिवाय त्यांच्या लग्नाची इतक कोणतीही झलक पाहायला मिळाली नाही. 
advertisement
7/8
रश्मिका आणि विजय यांनी ऑक्टोबरमध्ये सीक्रेट साखरपुडा केला होता. त्यानंतर आता चार महिन्यातच दोघांनी लग्न करत त्यांच्या नात्याची माहिती सर्वांना दिली. 
advertisement
8/8
रश्मिका आणि विजय लग्नानंतर रणबली या सिनेमातून पुन्हा एकत्र दिसणार आहेत. त्यांच्या लग्नानंतर दुसऱ्याच दिवशी सिनेमातील एक रोमँटीक गाणं रिलीज करण्यात आलं. 
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Rashmika-Vijay Wedding : रश्मिका-विजयने केलं राजेशाही लग्न, पण बसला 60 कोटींचा फटका? नेमकं झालं काय?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल