Team India : टीम इंडिया वर्ल्ड कपमधून बाहेरच झाली असती, 5 मुमेंट 5 जण... ज्यांनी एकहाती गेम फिरवला!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
टीम इंडियाने लागोपाठ दुसरा टी-20 वर्ल्ड कप जिंकून इतिहास घडवला आहे. फायनलमध्ये टीम इंडियाने न्यूझीलंडवर 96 रननी दणदणीत विजय मिळवत टी-20 वर्ल्ड कपच्या ट्रॉफीवर कब्जा केला.
advertisement
1/9

लागोपाठ 2 टी-20 वर्ल्ड कप जिंकणारी टीम इंडिया पहिलीच आहे. याशिवाय 3 टी-20 वर्ल्ड कप आणि घरच्या मैदानात टी-20 वर्ल्ड कप जिंकण्याचा विक्रमही भारतीय टीमने केला आहे.
advertisement
2/9
यंदाच्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाने केवळ एकच सामना गमावला. सुपर-8 मध्ये भारताचा दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात पराभव झाला, त्यानंतर वेस्ट इंडिजविरुद्धचा सामना टीम इंडियासाठी करो या मरोचा होता. या सामन्यात विजय मिळवून टीम इंडियाने सेमी फायनलला धडक दिली.
advertisement
3/9
सेमी फायनलमध्ये भारताने इंग्लंडचा आणि फायनलमध्ये न्यूझीलंडचा पराभव करून टीम इंडिया चॅम्पियन बनली. शेवटचे तिन्ही सामने टीम इंडियासाठी नॉक आऊट होते, एक पराभव आणि भारताचं ट्रॉफी जिंकण्याचं स्वप्न भंगलं असतं. टी-20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचा 5 वेळा पराभव होणार होता, पण 5 खेळाडूंनी मॅच विनिंग खेळी करून विजय खेचून आणला.
advertisement
4/9
टी-20 वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यत युएसएविरुद्ध टीम इंडियाची अवस्था 77/6 अशी झाली होती, पण कर्णधार सूर्यकुमार यादवने 49 बॉलमध्ये नाबाद 84 रनची खेळी केली, ज्यामुळे टीम इंडियाने 20 ओव्हरमध्ये 161/9 एवढा स्कोअर केला. हा सामना भारताने 29 रननी जिंकला.
advertisement
5/9
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात इशान किशनने 40 बॉलमध्ये 77 रन केले. श्रीलंकेतल्या संथ खेळपट्टीमुळे या सामन्यात टीम इंडियाच्या इतर खेळाडूंना रन करण्यात अडचणी येत होत्या.
advertisement
6/9
इशानने केलेल्या धमाकेदार सुरूवातीमुळे भारताचा स्कोअर 8.3 ओव्हरमध्ये 88 रन झाला, पण तरीही टीम इंडियाला 20 ओव्हरमध्ये 175 पर्यंतच मजल मारता आली. या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानचा 114 रनवर ऑलआऊट झाला.
advertisement
7/9
झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यात तिलक वर्माने 16 बॉलमध्ये नाबाद 44 रन केले. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पराभवानंतर टीम इंडियाला सेमी फायनलला पोहोचण्यासाठी हा सामना जिंकावाच लागणार होता, तिलकने खालच्या क्रमांकावर बॅटिंगला येऊन वादळी खेळी केली, त्यामुळे टीम इंडियाचा स्कोअर 256 झाला.
advertisement
8/9
वेस्ट इंडिजविरुद्धच्या करो या मरो च्या सामन्यात संजू सॅमसनने 50 बॉलमध्ये नाबाद 97 रनची खेळी केली, त्यामुळे टीम इंडियाने 196 रनचा पाठलाग करून विक्रमी विजय मिळवला.
advertisement
9/9
इंग्लंडविरुद्धच्या सेमी फायनलमध्ये अक्षर पटेलने दोन वेळा उत्कृष्ट फिल्डिंग केली, ज्यामुळे सामना टीम इंडियाच्या बाजूने फिरला आणि भारताचा 7 रननी थरारक विजय झाला. अक्षर पटेलने बुमराहच्या बॉलिंगवर हॅरी ब्रुकचा 25 मीटर धावत उलटा जाऊन कॅच पकडला. यानंतर त्याने बाऊंड्री लाईनवर विल जॅक्सचा कॅच पकडून तो शिवम दुबेच्या हातात दिला.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
Team India : टीम इंडिया वर्ल्ड कपमधून बाहेरच झाली असती, 5 मुमेंट 5 जण... ज्यांनी एकहाती गेम फिरवला!