बॉलिवूडच्या टॉप स्टार्स चंकी पांडेच्या प्रेमात होत्या वेड्या; एकीचा घटस्फोट, दुसरीने लग्नच केलं नाही, तिसरी तीन मुलांची आई
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Chunky Pandey: ८० आणि ९० च्या दशकात चंकी पांडे हा बॉलीवूडचा सर्वात मोठा क्रश होता. केवळ सामान्य मुलीच नाही, तर आजच्या काळातील दिग्गज अभिनेत्री आणि दिग्दर्शिका एकेकाळी चंकीच्या प्रेमात वेड्या होत्या.
advertisement
1/8

चंकी पांडे म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर त्याचे विनोदी रोल आणि अनोखी स्टाईल येते. पण तुम्हाला माहीत आहे का? ८० आणि ९० च्या दशकात चंकी पांडे हा बॉलीवूडचा सर्वात मोठा क्रश होता.
advertisement
2/8
केवळ सामान्य मुलीच नाही, तर आजच्या बॉलीवूडमधील दिग्गज अभिनेत्री आणि दिग्दर्शिका एकेकाळी चंकीच्या प्रेमात वेड्या होत्या. २०२२ साली चंकी पांडेच्या वाढदिवसानिमित्त या सुंदरींनी सोशल मीडियावर चक्क आपल्या जुन्या प्रेमाची कबुली दिली होती.
advertisement
3/8
चंकी पांडेची मुलगी अनन्या पांडे हिने आपल्या बाबांना शुभेच्छा देण्यासाठी सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले होते. या फोटोंवर सुप्रसिद्ध दिग्दर्शिका फराह खान हिने केलेली कमेंट इंटरनेटवर तुफान व्हायरल झाली होती.
advertisement
4/8
फराहने गमतीने लिहिलं, "मी तुझी आई झाले असते!" इतकंच नाही, तर चंकी आणि त्याची पत्नी भावना पांडे यांच्यासोबतचा एक फोटो शेअर करत फराहने लिहिलं, "पती, पत्नी आणि भावना पांडे! हॅपी बर्थडे चंकी... हे आपलं भविष्य असू शकलं असतं!"
advertisement
5/8
केवळ फराहच नाही, तर बॉलीवूडची फिटनेस क्वीन मलायका अरोरा हिनेही चंकीबद्दलच्या आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. चंकीचा एक जुना फोटो शेअर करत तिने लिहिलेलं, "माझा पहिला क्रश, चंकी पांडेला वाढदिवसाच्या शुभेच्छा." तथापि, मलायका अरोराने अरबाझ खानशी घटस्फोट घेतला. त्यानंतर अर्जुन कपूरचं तिचं रिलेशनशिपही काही वर्षांत संपुष्टात आलं.
advertisement
6/8
सर्वात जास्त लक्ष वेधून घेतलं ते एकता कपूर हिच्या पोस्टने. एकताने चंकीवर असलेल्या तिच्या जुन्या क्रशबद्दल सांगितलेलं की, "काही वर्षांपूर्वी मी चंकीला पाहून लाजून लालेलाल व्हायचे. त्यावेळी जर त्याने माझ्या भावनांना प्रतिसाद दिला असता, तर आज मी सुद्धा बॉलीवूड वाईफ झाले असते."
advertisement
7/8
चंकी आणि भावना पांडे १९९८ मध्ये विवाहबंधनात अडकले. त्यांना अनन्या आणि रयसा अशा दोन मुली आहेत. चंकीची पत्नी भावना पांडे 'फॅब्युलस लाईव्ह्ज ऑफ बॉलीवूड वाईव्हज' या वेबसिरीजमुळे जबरदस्त चर्चेत आली होती.
advertisement
8/8
या शोच्या यशाबद्दल बोलताना भावना म्हणालेली, "मी नेहमीच करिअरवर लक्ष देणारी स्त्री राहिले आहे. या शोमुळे लोकांना मी नक्की कोण आहे, हे खऱ्या अर्थाने समजलं. प्रेक्षकांकडून मिळणाऱ्या प्रेमाबद्दल मी खूप कृतज्ञ आहे."
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
बॉलिवूडच्या टॉप स्टार्स चंकी पांडेच्या प्रेमात होत्या वेड्या; एकीचा घटस्फोट, दुसरीने लग्नच केलं नाही, तिसरी तीन मुलांची आई