Prajakta Gaikwad : लग्नाच्या 3 महिन्यात इतकी बदलली प्राजक्ता गायकवाड, ड्रेसपासून हेअर स्टाईलपर्यंत, ओळखूही येईना, PHOTO
- Published by:Minal Gurav
Last Updated:
अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडनं नुकतेच तिचे काही फोटो शेअर केलेत. लग्नानंतर तिचा बदलेला लूक पाहून सगळेच आश्चर्यचकीत झालेत.
advertisement
1/7

मराठी अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड हिचं डिसेंबर महिन्यात लग्न झालं. शंभुराज खुटवडसोबत तिनं लग्नगाठ बांधली. पारंपरिक पद्धतीने पार पडलेल्या या लग्नसोहळ्याची त्या वेळी खूप चर्चा झाली होती.
advertisement
2/7
लग्नानंतर प्राजक्ताने काही काळ वैयक्तिक आयुष्याला वेळ दिला. मात्र आता ती पुन्हा कामाला सुरुवात करताना दिसत आहे.
advertisement
3/7
लग्नानंतर अवघ्या तीन महिन्यांत प्राजक्तामध्ये झालेला बदल चाहत्यांना आश्चर्यचकित करणारा आहे. अलीकडेच तिने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केलेत. तिचा पूर्णपणे वेगळा लूक पाहायला मिळत आहे.
advertisement
4/7
विशेष म्हणजे तिने तिची हेअर स्टाईल पूर्ण बदलली आहे. पुढचे केस तिने साधना कटमध्ये कापले आहेत. हा रेट्रो टच असलेला लूक तिच्यावर उठून दिसत आहे.
advertisement
5/7
याशिवाय प्राजक्ताने डिझायनर ड्रेसमध्ये खास फोटोशूट केलं आहे. या फोटोमध्ये तिचा आत्मविश्वास आणि ग्लॅमरस अंदाज दिसतोय. फोटो पोस्ट करताना तिने कॅप्शनमध्ये हार्ट इमोजी शेअर केले आहेत. त्यामुळे चाहत्यांमध्ये अधिकच उत्सुकता निर्माण झाली आहे.
advertisement
6/7
तिचा हा लूक पाहून अनेकांनी कमेंट्स करत आश्चर्य व्यक्त केलं आहे. तर काहींनी तिच्या या बदलामागे नवा प्रोजेक्ट असण्याची शक्यता व्यक्त केली आहे. एखाद्या मालिकेसाठी किंवा चित्रपटासाठी हा लूक केला असावा असा अंदाजही वर्तवला आहे.
advertisement
7/7
लग्नानंतर अभिनेत्रींच्या आयुष्यात अनेक बदल घडतात असं म्हटलं जातं. मात्र प्राजक्ताने केलेला हा बदल केवळ वैयक्तिक स्टाईल स्टेटमेंट आहे की करिअरमधील नव्या टप्प्याची सुरुवात हे येत्या काळात स्पष्ट होईल. सध्या मात्र तिच्या या ट्रान्सफॉर्मेशनची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Prajakta Gaikwad : लग्नाच्या 3 महिन्यात इतकी बदलली प्राजक्ता गायकवाड, ड्रेसपासून हेअर स्टाईलपर्यंत, ओळखूही येईना, PHOTO