TRENDING:

'माझ्यावरचा हा कलंक...', 2 मुलांचा बाप अन् विनयभंगाचा आरोप? नोरा फतेहीच्या रुमर्ड बॉयफ्रेंडवर खटला दाखल, नेमकं प्रकरण काय?

Last Updated:
Nora Fatehi's rumored boyfriend Achraf Hakimi: बॉलिवूडची डान्सिंग क्वीन नोरा फतेही चा कथित बॉयफ्रेंड आणि मोरोक्कोचा स्टार फुटबॉलर अश्रफ हकीमीवर विनयभंगाचा आरोप करण्यात आला आहे.
advertisement
1/10
2 मुलांचा बाप अन् विनयभंगाचा आरोप? नोरा फतेहीच्या रुमर्ड बॉयफ्रेंडवर खटला दाखल
बॉलिवूडची डान्सिंग क्वीन नोरा फतेही हिने आपल्या अदांनी संपूर्ण जगाला घायाळ केलंय, पण सध्या तिचं नाव एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आलं आहे. निमित्त ठरलंय तिचा कथित बॉयफ्रेंड आणि मोरोक्कोचा स्टार फुटबॉलर अश्रफ हकीमी.
advertisement
2/10
गेल्या अनेक महिन्यांपासून बलात्काराच्या गंभीर आरोपांखाली दबलेल्या हकीमीने अखेर आपले मौन सोडले असून, "मी निर्दोष आहे," असा दावा कोर्टासमोर केला आहे.
advertisement
3/10
पॅरिस सेंट-जर्मेन (PSG) या जागतिक दर्जाच्या क्लबकडून खेळणारा अश्रफ हकीमी सध्या फुटबॉलपेक्षा कोर्टाच्या वाऱ्यांमुळे जास्त चर्चेत आहे. २०२३ मध्ये एका तरुणीने हकीमीवर त्याच्या घरात बलात्कार केल्याचा खळबळजनक आरोप केला होता.
advertisement
4/10
या प्रकरणाचा तपास फ्रेंच पोलिसांनी पूर्ण केला असून, पॅरिसमधील एका न्यायाधीशाने आता हकीमीवर रीतसर खटला चालवण्याचे आदेश दिले आहेत. म्हणजेच, आता हकीमीला गुन्हेगारी न्यायालयात आपली बाजू सिद्ध करावी लागणार आहे.
advertisement
5/10
कोर्टाच्या आदेशानंतर हकीमीने सोशल मीडियावर एक सडेतोड पोस्ट शेअर केली. तो म्हणतो, "आजच्या काळात केवळ आरोप झाले तरी खटला भरला जातो, मग पुरावे काहीही सांगत असोत.
advertisement
6/10
हे खरं तर अन्यायकारक आहे. मी शांतपणे या खटल्याची वाट पाहत आहे, कारण मला खात्री आहे की सत्य जगासमोर येईल आणि माझ्यावरील हा कलंक पुसला जाईल." हकीमीचा आत्मविश्वास पाहता, तो कायद्याच्या या लढाईसाठी पूर्णपणे सज्ज असल्याचं दिसतंय.
advertisement
7/10
२७ वर्षीय अशरफ हकीमी एक लोकप्रिय फुटबॉल प्लेअर असून त्याचे आईवडील हे मोरोक्कन अरब वंशाचे आहेत. 2020 साली त्याचं हिबा अबूक या स्पॅनिश अभिनेत्रीसोबत लग्न झालं होतं. त्यांना 2 मुले आहेत. परंतु, दोघांमध्ये कायम भांडणं होत असल्याने त्यांचं नाते काही वर्षातच तुटलं. 2023 साली दोघांनी एकमेकांशी घटस्फोट घेतला.
advertisement
8/10
फ्रान्समधील नान्टेरे कोर्टाने हे प्रकरण आता विशेष गुन्हेगारी न्यायालयाकडे सोपवलं आहे. हकीमीचे वकील या निर्णयाला आव्हान देणार आहेत. मात्र, जर हा फुटबॉल स्टार दोषी आढळला, तर त्याला तब्बल १५ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. सध्या त्याच्यावर खटला सुरू होणार असल्याने फुटबॉल विश्वात आणि चाहत्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे.
advertisement
9/10
नोरा फतेही काही काळापूर्वी 'आफ्रिकन कप ऑफ नेशन्स'चा सामना पाहण्यासाठी मोरोक्कोला गेली होती. तिथे ती हकीमीला आणि त्यांच्या टीमला मनापासून चिअर करताना दिसली होती. तेव्हापासूनच या दोघांच्या नात्याच्या चर्चांना उधाण आलं.
advertisement
10/10
नोरा आणि हकीमी अनेकदा एकत्र दिसल्याने त्यांच्या डेटिंगच्या बातम्या वारंवार समोर येत असतात. मात्र, हकीमीवर झालेल्या या गंभीर आरोपांमुळे नोराच्या चाहत्यांनाही धक्का बसला आहे. नोराने अद्याप या विषयावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
'माझ्यावरचा हा कलंक...', 2 मुलांचा बाप अन् विनयभंगाचा आरोप? नोरा फतेहीच्या रुमर्ड बॉयफ्रेंडवर खटला दाखल, नेमकं प्रकरण काय?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल