TRENDING:

T20 World Cup : आफ्रिका-वेस्ट इंडिजमध्ये कोण कुणावर भारी? आकडे पाहून सूर्याला धडकी भरली!

Last Updated:
टी-20 वर्ल्ड कपच्या सुपर-8 मध्ये टीम इंडियाचा दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 76 रननी पराभव झाला. या पराभवामुळे टीम इंडियाच्या सेमी फायनलला पोहोचण्याच्या प्रवासात अडथळे निर्माण झाले आहेत.
advertisement
1/9
आफ्रिका-वेस्ट इंडिजमध्ये कोण कुणावर भारी? आकडे पाहून सूर्याला धडकी भरली!
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पराभवानंतर वेस्ट इंडिजने झिम्बाब्वेला 107 रननी धूळ चारल्यामुळे टीम इंडियाच्या अडचणीत आणखी वाढ झाली, कारण वेस्ट इंडिजचा नेट रनरेट +5.350 आणि दक्षिण आफ्रिकेचा नेट रनरेट +3.800 आहे. भारताचा नेट रनरेट मात्र मायनस 3.800 आहे.
advertisement
2/9
सेमी फायनलला पोहोचण्यासाठी टीम इंडियाला त्यांचे झिम्बाब्वे आणि वेस्ट इंडिजविरुद्धचे सामने जिंकावे लागणार आहेत. तसंच नेट रनरेटच्या इक्वेशनशिवाय सेमी फायनलला पोहोचण्यासाठी टीम इंडियाला दक्षिण आफ्रिकेच्या कामगिरीवर अवलंबून राहावं लागणार आहे.
advertisement
3/9
गुरूवारी संध्याकाळी 7 वाजता भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात सुपर-8 चा सामना होणार आहे, पण त्याआधी टीम इंडियाचं लक्ष दुपारी होणाऱ्या दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज यांच्यातल्या सामन्यावर असेल. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या विजयासाठी टीम इंडियाला प्रार्थना करावी लागणार आहे.
advertisement
4/9
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात वेस्ट इंडिजचा विजय झाला, भारताने त्यांचे उरलेले दोन्ही सामने जिंकले आणि दक्षिण आफ्रिकेने झिम्बाब्वेला पराभूत केलं, तर भारत, दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज यांचे प्रत्येकी 4-4 पॉईंट्स होतील, त्यामुळे सर्वोत्तम नेट रनरेट असलेल्या दोन टीम सेमी फायनलला जातील, टीम इंडियासाठी हे अडचणीचं ठरू शकतं.
advertisement
5/9
सेमी फायनलचं हे समीकरण पाहता दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज यांचा सामना भारतासाठी महत्त्वाचा आहे. या दोन्ही टीमचं टी-20 फॉरमॅटमधील रेकॉर्ड टीम इंडियाला धडकी भरवणारं आहे.
advertisement
6/9
दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज यांच्यात आतापर्यंत 29 टी-20 आंतरराष्ट्रीय मॅच झाल्या आहेत, यातल्या 15 सामन्यांमध्ये वेस्ट इंडिजचा विजय झाला आहे, तर 14 सामने दक्षिण आफ्रिकेने जिंकले आहेत. हे रेकॉर्ड पाहता वेस्ट इंडिज एका विजयाने आघाडीवर असली तरी दोन्ही टीममध्ये कांटे की टक्कर झाली आहे.
advertisement
7/9
टीम इंडियासाठी दिलासा देणारं दुसरं रेकॉर्ड म्हणजे टी-20 वर्ल्ड कपमधली दोन्ही टीमची कामगिरी. टी-20 वर्ल्ड कपच्या इतिहासात वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात 5 मॅच झाल्या आहेत, यातल्या 4 सामन्यांमध्ये दक्षिण आफ्रिकेचा विजय झाला असून वेस्ट इंडिजने फक्त एक सामना जिंकला आहे.
advertisement
8/9
वेस्ट इंडिजने टी-20 वर्ल्ड कपमध्ये दक्षिण आफ्रिकेवर जो एकमेव विजय मिळवला आहे तो भारतात 2016 साली झालेल्या टी-20 वर्ल्ड कपमधला आहे. नागपूरमध्ये झालेल्या या सामन्यात वेस्ट इंडिजने 3 विकेटने विजय मिळवला होता.
advertisement
9/9
दक्षिण आफ्रिकेने 2007 साली 8 विकेटनी, 2009 साली 20 रननी, 2021 साली 8 विकेटनी आणि 2024 साली 3 विकेटनी वेस्ट इंडिजवर विजय मिळवला आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
T20 World Cup : आफ्रिका-वेस्ट इंडिजमध्ये कोण कुणावर भारी? आकडे पाहून सूर्याला धडकी भरली!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल