TRENDING:

Dhurandhar 2 मधील अभिनेत्याला लागली लॉटरी, मिळाली रिषभ शेट्टीची बिग बजेट फिल्म! आता साऊथमध्ये घालणार राडा

Last Updated:
सध्या जिकडे बघावे तिथे एकाच सिनेमाची चर्चा आहे, तो म्हणजे धुरंधर २. अशातच फिल्ममधील एका कलाकाराला लॉटरी लागली असून साऊथ स्टार रिषभ शेट्टीच्या आगामी चित्रपटात त्याची वर्णी लागली आहे.
advertisement
1/9
Dhurandhar 2 मधील अभिनेत्याला लागली लॉटरी, मिळाली रिषभ शेट्टीची बिग बजेट फिल्म!
सध्या जिकडे बघावे तिथे एकाच सिनेमाची चर्चा आहे, तो म्हणजे धुरंधर २. अवघ्या चार दिवसांत या फिल्मने ४०० कोटींचा गल्ला जमवला असून आजच्या दिवसांत ती ५०० कोटींचा आकडा पार करेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
advertisement
2/9
या फिल्ममध्ये रणवीर सिंग, संजय दत्त, आर माधवन, अर्जुन रामपाल यांच्या मुख्य भूमिका असून प्रत्येकाने आपल्या पात्राला पुरेपूर न्याय दिला आहे. अशातच फिल्ममधील एका कलाकाराला लॉटरी लागली असून साऊथ स्टार रिषभ शेट्टीच्या आगामी चित्रपटात त्याची वर्णी लागली आहे.
advertisement
3/9
कांतारा फेम अभिनेता रिषभ शेट्टी सध्या त्याचा आगामी चित्रपट 'द प्राईड ऑफ भारत: छत्रपती शिवाजी महाराज' मुळे चर्चेत आहे. या सिनेमामुळे महाराष्ट्राचे आणि मराठी जनतेचे आराध्य दैवत असलेले छत्रपती शिवराय यांची कथा दक्षिणेसह संपूर्ण देशात पाहिली जाणार आहे.
advertisement
4/9
या फिल्ममध्ये आता धुरंधरमधील एका अभिनेत्याची एन्ट्री झालेली असून त्याच्या येण्याने या फिल्मची उंची आणखीनच वाढणार आहे, यात शंका नाही. हा अभिनेता दुसरा कोणी नसून 'धुरंधर २' मध्ये मेजर इक्बालच्या भूमिकेत असणारा अर्जुन रामपाल आहे.
advertisement
5/9
अर्जुन रामपालच्या या पात्राने प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावलं आहे. आता धुरंधर नंतर अर्जुन रामपाल रिषभच्या फिल्ममधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याने प्रेक्षकांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.
advertisement
6/9
रिषभ शेट्टीच्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनपटावर आधारित 'द प्राईड ऑफ भारत: छत्रपती शिवाजी महाराज' या महाकाव्य चित्रपटात अर्जुन मुख्य खलनायकाची भूमिका साकारणार आहे.
advertisement
7/9
या चित्रपटात खुद्द रिषभ महाराजांच्या भूमिकेत दिसणार असून, त्यांच्यासमोर उभा ठाकणारा तितकाच ताकदवर शत्रू म्हणून अर्जुन रामपालची निवड करण्यात आली आहे.
advertisement
8/9
मिळालेल्या माहितीनुसार, अर्जुनची भूमिका केवळ एका साध्या व्हिलनची नसेल, तर ती इतिहासातील एका महत्त्वाच्या आणि धूर्त शत्रूची असेल. संदीप सिंह यांच्या दिग्दर्शनाखाली साकारला जाणारा हा चित्रपट तांत्रिकदृष्ट्या अतिशय भव्य असणार आहे.
advertisement
9/9
रिषभ शेट्टी आणि अर्जुन रामपाल यांच्या व्यतिरिक्त या चित्रपटात राजमाता जिजाऊंच्या भूमिकेत दिग्गज अभिनेत्री शेफाली शाह दिसणार आहे. धुरंधरच्या यशानंतर आता अर्जुन ऐतिहासिक सिनेमामध्ये दिसणार असून हा सिनेमा त्याच्या करिअरमधील एक मोठा टप्पा ठरू शकतो.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Dhurandhar 2 मधील अभिनेत्याला लागली लॉटरी, मिळाली रिषभ शेट्टीची बिग बजेट फिल्म! आता साऊथमध्ये घालणार राडा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल