TRENDING:

रणवीर सिंगनंतर अक्षय खन्नाचाही भाव वाढला, अजय देवगणच्या Drishyam 3 मधून काढता पाय, नक्की काय बिनसलं?

Last Updated:
Akshaye Khanna Dhurandhar: अक्षयने चक्क अजय देवगणच्या बहुप्रतिक्षित 'दृश्यम ३' मधून काढता पाय घेतल्याची चर्चा सध्या चित्रपटसृष्टीत रंगली आहे.
advertisement
1/9
रणवीर सिंगनंतर अक्षय खन्नाचाही भाव वाढला, अजय देवगणच्या Drishyam3 मधून काढता पाय
मुंबई: बॉलिवूडचा सर्वात अंडररेटेड पण तितकाच कसलेला अभिनेता म्हणजे अक्षय खन्ना. सध्या तो यशाच्या अशा शिखरावर आहे. रणवीर सिंगसोबतच्या त्याच्या 'धुरंधर' या स्पाय थ्रिलरने बॉक्स ऑफिसचे सगळे रेकॉर्ड मोडीत काढले आहेत.
advertisement
2/9
पण याच आनंदाच्या लाटेत एक अशी बातमी समोर आलीये, ज्यामुळे चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. अक्षयने चक्क अजय देवगणच्या बहुप्रतिक्षित 'दृश्यम ३' मधून काढता पाय घेतल्याची चर्चा सध्या चित्रपटसृष्टीत रंगली आहे.
advertisement
3/9
सोशल मीडियावर 'बॉलीवूड मशीन' नावाच्या एका पेजने असा दावा केला आहे की, अक्षय आणि दृश्यम ३ च्या निर्मात्यांमध्ये ठिणगी पडली आहे. त्याचं मुख्य कारण म्हणजे मानधन.
advertisement
4/9
'धुरंधर'च्या तुफान यशानंतर अक्षय खन्नाच्या ब्रँड व्हॅल्यूमध्ये जबरदस्त वाढ झाली आहे. रणवीर सिंगसारखा सुपरस्टार समोर असतानाही अक्षयने ज्या पद्धतीने आपली स्क्रीन प्रेझेन्स सिद्ध केली, त्यानंतर त्याने आपली फी वाढवण्याचा निर्णय घेतला.
advertisement
5/9
पण ही केवळ पैशांची गोष्ट नाही. सूत्रांच्या मते, अक्षयला 'दृश्यम ३' मधील त्याच्या लूक आणि काही क्रिएटिव्ह बाबींमध्ये बदल हवे होते. निर्मात्यांशी या विषयावर चर्चा झाली, पण तिथे त्यांचं एकमत झालं नाही. यामुळेच अक्षयने या प्रोजेक्टपासून दूर राहणं पसंत केल्याचं बोललं जातंय.
advertisement
6/9
अक्षयच्या या निर्णयावर सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. काही चाहत्यांचं म्हणणं आहे की, "जर 'धुरंधर'मध्ये त्याने फिल्म १००० कोटींच्या क्लबमध्ये पोहचवण्यात मोलाचा वाटा उचलला असेल, तर त्याने आपला भाव वाढवणं हक्काचंच आहे."
advertisement
7/9
तर काही 'दृश्यम' प्रेमी मात्र या बातमीने नाराज झाले आहेत. "अक्षय आणि अजय देवगण यांची जुगलबंदी पाहणं ही एक मेजवानी असते, ती यंदा मुकणार का?" असा प्रश्न प्रेक्षक विचारत आहेत.
advertisement
8/9
चाहत्यांसाठी एक दिलासादायक बातमी ही आहे की, अक्षय आणि निर्मात्यांचे संबंध पूर्णपणे तुटलेले नाहीत. अजूनही त्यांच्यातील चर्चा सुरू आहेत. जर मानधनाचा आणि लूकचा एखादा सुवर्णमध्य निघाला, तर कदाचित आपल्याला पुन्हा एकदा अक्षय खन्ना त्या डॅशिंग भूमिकेत दिसू शकेल.
advertisement
9/9
अभिषेक पाठक दिग्दर्शित 'दृश्यम ३' हा चित्रपट २ ऑक्टोबर २०२६ रोजी प्रदर्शित होणार आहे. आता विजय साळगावकरच्या या खेळात अक्षय खन्ना पुन्हा चॅलेंज देणार की कोणताही नवा चेहरा त्याची जागा घेणार, हे पाहणं रंजक ठरेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
रणवीर सिंगनंतर अक्षय खन्नाचाही भाव वाढला, अजय देवगणच्या Drishyam 3 मधून काढता पाय, नक्की काय बिनसलं?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल