TRENDING:

वाढदिवसाचा डबल धमाका! विशाल निकमने गुपचूप उरकल लग्न; गंगेच्या काठी 'सौंदर्या'सोबत बांधली सात जन्मांची गाठ

Last Updated:
Vishal Nikam-Akshaya Hindalkar Wedding: विशालने केवळ आपला वाढदिवस साजरा केला नाही, तर याच मुहूर्तावर आपली 'सौंदर्या' म्हणजेच अभिनेत्री अक्षया हिंदळकर हिच्याशी लग्नगाठ बांधून आयुष्याची नवीन इनिंग सुरू केली आहे.
advertisement
1/8
विशाल निकमने गुपचूप उरकल लग्न;गंगेच्या काठी सौंदर्यासोबत बांधली सात जन्मांची गाठ
मुंबई : मराठी सिनेसृष्टीतील डॅशिंग अभिनेता आणि 'बिग बॉस मराठी ३' विजेता विशाल निकम याने आपल्या चाहत्यांना असं काही सरप्राईज दिलं आहे, की सोशल मीडियावर सध्या आनंदाचा पूर आलाय.
advertisement
2/8
१० फेब्रुवारी रोजी विशालचा वाढदिवस होता, पण हा वाढदिवस त्याच्या आयुष्यातील सर्वात अविस्मरणीय दिवस ठरेल, असं कोणालाही वाटलं नव्हतं.
advertisement
3/8
विशालने केवळ आपला वाढदिवस साजरा केला नाही, तर याच मुहूर्तावर आपली 'सौंदर्या' म्हणजेच अभिनेत्री अक्षया हिंदळकर हिच्याशी लग्नगाठ बांधून आयुष्याची नवीन इनिंग सुरू केली आहे.
advertisement
4/8
नुकतंच विशाल आणि अक्षया यांनी आपल्या साखरपुड्याचे फोटो शेअर करताच फोटोंनी इंटरनेटवर धुमाकूळ घातला. निसर्गाच्या सानिध्यात, जवळच्या मित्र-मैत्रिणींच्या उपस्थितीत या जोडीने एकमेकांना अंगठ्या घातल्या होत्या.
advertisement
5/8
हे फोटो पाहून चाहते खूश होतेच, पण दिवसाच्या शेवटी विशालने जी इन्स्टा स्टोरी शेअर केली, त्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या.
advertisement
6/8
विशालने स्टोरीमध्ये लिहिलं की, "आज १० फेब्रुवारी २०२६ - माझा वाढदिवस! सर्वांच्या शुभेच्छांसाठी धन्यवाद. प्रवासाच्या घाईमुळे कोणाचे फोन किंवा रिप्लाय देता आले नाहीत, त्याबद्दल क्षमस्व. आजच्या या खास दिवशी महादेव आणि माता पार्वती यांच्या आशीर्वादाने मी आणि माझी सखी अक्षताने सात जन्मांची गाठ बांधली, लग्न सुफळ संपूर्ण पार पडलं, फोटो उद्या अपडेट करेन. हर हर महादेव."
advertisement
7/8
विशालने आपल्या या अत्यंत खाजगी लग्नासाठी हरिद्वारची पावन भूमी निवडली होती. गंगेच्या काठी, महादेवाच्या साक्षीने कोणतंही राजेशाही प्रदर्शन न करता, अत्यंत साध्या आणि आध्यात्मिक वातावरणात दोघे एकमेकांचे झाले आहेत.
advertisement
8/8
"हर हर महादेव" म्हणत विशालने आपल्या संसाराची सुरुवात केली आहे. लग्नाचे अधिकृत फोटो त्याने अद्याप गुलदस्त्यात ठेवले असून, उद्या ते चाहत्यांच्या भेटीला येतील, असं त्याने आश्वासन दिलं आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
वाढदिवसाचा डबल धमाका! विशाल निकमने गुपचूप उरकल लग्न; गंगेच्या काठी 'सौंदर्या'सोबत बांधली सात जन्मांची गाठ
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल