Guess Who : पहिल्याच सिनेमात शाहरुखसोबत रोमान्स, पती 65वे श्रीमंत भारतीय, मराठमोळी अभिनेत्री 450 अब्जाची मालकीण
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Bollywood Actress : गायत्री जोशीने 'स्वदेश' चित्रपटातून पदार्पण केले आणि नंतर अचानक चित्रपटसृष्टी सोडून अब्जाधीश विकास ओबेरॉय यांच्याशी लग्न केले. ती सध्या कौटुंबिक जीवनात रमली आहे.
advertisement
1/8

शाहरुख खानच्या 'स्वदेश' या सिनेमातून अभिनयात पदार्पण करणारी गायत्री पहिल्याच चित्रपटातून लोकप्रिय झाली होती. पण तिने अचानकच चित्रपटांचा निरोप घेतला आणि एका अब्जाधीशाशी लग्न केले.
advertisement
2/8
एका मुलाखतीत गायत्रीने चित्रपट सोडण्याचे कारण सांगितले होते. 20 मार्चला गायत्री जोशीचा वाढदिवस आहे. ती सध्या कशी आहे आणि तिचे पती काय करतात, हे जाणून घेऊया.
advertisement
3/8
गायत्री जोशीच्या आईचे नाव हेमा मालिनी आणि वडिलांचे नाव रामनिवास रुंठाला आहे. शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्यानंतर गायत्रीने व्हीजे म्हणून अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली.
advertisement
4/8
त्यानंतर तिने मॉडेलिंगमध्ये प्रवेश केला आणि 1999 मध्ये फेमिना मिस इंडिया स्पर्धेत सहभागी झाली. त्या स्पर्धेत ती टॉप-5 मध्ये पोहोचली. 2000 मध्ये तिने फेमिना मिस इंडिया इंटरनॅशनलचा किताब जिंकला.
advertisement
5/8
यानंतर गायत्री जोशीने अनेक मॉडेलिंग प्रोजेक्ट्स केले. ती अनेक जाहिरातींमध्ये दिसली, परंतु खऱ्या अर्थाने प्रसिद्धी मिळाली आशुतोष गोवारीकरच्या 'स्वदेश'मुळे. यात ती शाहरुख खानच्या समोर दिसली होती. यानंतर गायत्रीला अनेक चित्रपटांचे ऑफर आले. पण तिने अचानकच चित्रपटसृष्टी सोडली.
advertisement
6/8
याचे कारण गायत्री जोशीने 'मिड डे'ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते. तिने म्हटले, "मी खुल्या मनाने स्क्रिप्ट्स ऐकायला तयार होते. मला खात्री होती की एक मोठी संधी मला मिळेल. मला बेस्ट न्यूकमरचे अवॉर्ड्स मिळाले, पण सगळेच काही योजने प्रमाणे होत नाही. जेव्हा मी माझ्या पतीला भेटले, तेव्हा मला जाणवले की बॉलिवूडपेक्षा मला कौटुंबिक जीवन अधिक महत्त्वाचे आहे."
advertisement
7/8
गायत्री जोशीने चित्रपट सोडल्यानंतर विकास ओबेरॉय यांच्याशी लग्न केले, जे एक अब्जाधीश व्यावसायिक आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, विकास ओबेरॉय यांची संपत्ती 45000 कोटी म्हणजेच 450 अब्ज इतकी आहे. विकास 'ओबेरॉय रियलटी लिमिटेड'चे चेयरमॅन आणि एमडी आहेत.
advertisement
8/8
फोर्ब्सच्या 2023 च्या अहवालानुसार, गायत्री जोशीचे पती विकास हे 65वे सर्वात श्रीमंत भारतीय होते. त्यांच्याकडे पायलट लाइसेंस आहे आणि ते एका विमानाचे मालक आहेत. गायत्री जोशी अभिनय आणि चित्रपटांची दुनिया सोडल्यानंतर कौटुंबिक जीवनात रमली. ती आपल्या कुटुंबाचे संगोपन करत असून शांततेत जीवन जगत आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Guess Who : पहिल्याच सिनेमात शाहरुखसोबत रोमान्स, पती 65वे श्रीमंत भारतीय, मराठमोळी अभिनेत्री 450 अब्जाची मालकीण