'ती सध्या काय करते'नंतर आर्या आंबेकर पुन्हा हिरोईन होणार! झी मराठीच्या या मालिकेत एन्ट्री, प्रेक्षकही सरप्राइज
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Aarya Ambekar As Actress in Marathi Serial : ती सध्या काय करते या ब्लॉकबस्टर सिनेमानंतर गायिका आर्या आंबेकर पुन्हा अभिनेत्री म्हणून दिसणार आहे. झी मराठीच्या मालिकेत तिची एन्ट्री होणार आहे.
advertisement
1/9

सारेगमप लिटिल चॅम्पमधून पुढे आलेली गोड गळ्याची गायिका म्हणजेच आर्या आंबेकर. आपल्या गाण्याबरोबरच आर्याने तिच्या अभिनयाने देखील प्रेक्षकांची मनं जिंकली.
advertisement
2/9
आर्या आंबेकरनं आजवर अनेक सुंदर, सुरेख गाणी मराठी इंडस्ट्रीला दिली. आर्या आज मराठीतील काही टॉपच्या गायिकांपैकी एक आहे.
advertisement
3/9
अनेक सिनेमा, मालिकांसाठी आर्यानं गाणी गायली आहेत. तिच्या आवाजावर फक्त तरुणाई तर प्रत्येक वयोगटातील व्यक्ती प्रेम करते.
advertisement
4/9
आर्या आंबेकर केवळ एक उत्तम गायिका नाही तर उत्तम अभिनेत्री देखील आहे. ती सध्या काय करते या सिनेमात तिनं डेब्यू केला. तरुण वयातील तेजश्री प्रधानची भूमिका तिनं साकारली होती.
advertisement
5/9
आर्याने तिच्या डेब्यू सिनेमातील अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली. ती पहिल्यांदा अभिनय करतेय असं कोणाला वाटलं नाही. ती सध्या काय करतेनंतर आर्या पुन्हा अभिनेत्री म्हणून पडद्यावर यावी अशी तिच्या लाखो चाहत्यांची इच्छा होती.
advertisement
6/9
अखेर आर्याच्या चाहत्यांची ती इच्छा पूर्ण झाली आहे. आर्या पुन्हा एकदा अभिनेत्री म्हणून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. झी मराठीच्या 'कमळी' या मालिकेत आर्या आंबेकरची एन्ट्री झाली आहे. तिच्या एन्ट्रीचा प्रोमो देखील रिलीज झाला आहे.
advertisement
7/9
मालिकेत आर्या अनामिका हे पात्र साकारणार आहे. जी कमळीच्या कॉलेजमध्ये गायनाची शिक्षिका म्हणून रूजू झाली आहे. फक्त कॉलेजमध्ये नाही तर अनामिकाच्या येण्याने ऋषीच्या आयुष्यातही मोठी घडमोड घडणार आहे.
advertisement
8/9
अनामिका म्हणजे आर्या आंबेकरला अभिनेत्री म्हणून पाहताना चाहत्यांना मोठं सरप्राइज मिळालं आहे. प्रेक्षकांनी आनंद व्यक्त केला आहे. आर्याला कमळी मालिकेत पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.
advertisement
9/9
8 एप्रिलपासून आर्या आंबेकर कमळी मालिकेत दिसणार आहे. कमळी ही मालिका रात्री 9 वाजता झी मराठीवर टेलिकास्ट होते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
'ती सध्या काय करते'नंतर आर्या आंबेकर पुन्हा हिरोईन होणार! झी मराठीच्या या मालिकेत एन्ट्री, प्रेक्षकही सरप्राइज