संपत्तीच्या बाबतीत नवऱ्यालाही टक्कर देते ड्रीम गर्ल; अभिनयासोबत 'या' क्षेत्रातून करतात कमाई
- Published by:Nishigandha Kshirsagar
Last Updated:
Hema Malini Net Worth: ज्येष्ठ बॉलीवूड अभिनेत्री हेमा मालिनी यांच्या सौंदर्यावर आजही लाखो लोक फिदा होतात. हेमा आज आपला 75 वा वाढदिवस साजरा करत आहेत. बॉलिवूडची ड्रीम गर्ल आजही लोकांची आवडती आहे. आज हेमाच्या वाढदिवसाच्या आम्ही तुम्हाला त्यांच्या एकूण संपत्तीविषयी सांगणार आहोत.
advertisement
1/10

ज्येष्ठ बॉलीवूड अभिनेत्री हेमा मालिनी यांच्या सौंदर्यावर आजही लाखो लोक फिदा होतात. हेमा आज आपला 75 वा वाढदिवस साजरा करत आहेत.
advertisement
2/10
बॉलीवूडची ड्रीम गर्ल म्हणून प्रसिद्ध असलेली हेमा मालिनी ही अशा अभिनेत्रींपैकी एक आहे ज्यांनी आपल्या जबरदस्त अभिनयाने आणि सौंदर्याने अनेक दशके इंडस्ट्रीवर राज्य केले. हेमा यांनी 60 च्या दशकात चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं होतं.
advertisement
3/10
हेमा मालिनी यांनी 1968 मध्ये 'सपनो का सौदागर' मधून आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात केली. हेमा मालिनी यांनी धर्मेंद्रसोबत एकामागून एक अनेक चित्रपट केले आणि 1980 मध्ये त्यांच्याशी लग्न केले.
advertisement
4/10
पण, आज आम्ही तुम्हाला हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांच्या लव्हस्टोरीबद्दल किंवा त्यांच्या फिल्मी करिअरबद्दल नाही तर त्यांच्या नेट वर्थबद्दल सांगणार आहोत. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की हेमा मालिनी पती धर्मेंद्र आणि मुलगा सनी देओल यांना प्रॉपर्टीच्या बाबतीत टक्कर देतात.
advertisement
5/10
अभिनेत्री असण्याव्यतिरिक्त, हेमा मालिनी एक राजकारणी देखील आहेत आणि त्यांनी 2019 च्या निवडणुकीच्या शपथपत्रात त्यांच्या एकूण संपत्तीचा तपशील दिला होता.
advertisement
6/10
हेमा मालिनी कोट्यवधींच्या संपत्तीची मालक आहे. हेमाने जारी केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, त्यांच्याकडे एकूण 249 कोटी रुपयांची संपत्ती आहे.
advertisement
7/10
त्यापैकी 114 कोटी रुपये त्यांची स्वतःची संपत्ती असून तर 135 कोटी रुपये पती धर्मेंद्र यांचे आहेत.
advertisement
8/10
गेल्या काही वर्षांत हेमा यांच्या संपत्तीत सुमारे 72 कोटी रुपयांची वाढ झाली आहे. कारण, 2014 मध्ये तिने दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्याकडे 178 कोटी रुपयांची संपत्ती होती, ज्यामध्ये त्यांचे पती धर्मेंद्र यांच्या संपत्तीचाही समावेश होता.
advertisement
9/10
हेमा मालिनी या आलिशान गाड्यांच्या शौकीन आहेत. तिच्याकडे Audi Q5, Mercedes-Benz M-Class, Hyundai Santa Fe सारख्या गाड्या आहेत.
advertisement
10/10
दीर्घकाळ राजकारणात सक्रिय असलेल्या हेमा मालिनी यांच्या मालमत्तेबद्दल बोलायचे झाले तर लक्झरी गाड्यांशिवाय त्यांच्याकडे दागिन्यांचाही मोठा संग्रह आहे. होय, मालमत्तेच्या बाबतीत ती पती धर्मेंद्रला टक्कर देते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
संपत्तीच्या बाबतीत नवऱ्यालाही टक्कर देते ड्रीम गर्ल; अभिनयासोबत 'या' क्षेत्रातून करतात कमाई