TRENDING:

Vanita Kharat Home: हटके नेमप्लेट, मोजकंच फर्निचर अन् इंटिरियर; हास्यजत्रा फेम वनिता खरातचं सुटसुटीत घर पाहिलंत का?

Last Updated:
१० बाय १० च्या घरातून थेट अलिशान बिल्डिंगमध्येच 23व्या मजल्यावर अभिनेत्री वनिता खरात हिने नवं घर खरेदी केलं आहे. नेमकं अभिनेत्रीचं हे नवं घर कशा पद्धतीने दिसतंय, याची झलक आपण फोटोच्या माध्यमातून पाहणार आहोत. वनिताने इन्स्टाग्रामवर काही तासांपूर्वीच एक व्हिडिओ शेअर केली होती.
advertisement
1/7
हटके नेमप्लेट, मोजकंच फर्निचर अन् इंटिरियर; वनिता खरातच्या घरातले INSIDE Photos
प्रत्येक चाहत्याला आपल्या आवडत्या सेलिब्रिटीच्या घराबद्दल फार उत्सुकता असते, त्याच्या घरातील इंटिरियर, शिवाय त्याची आवडती वॉल (भिंत) अशा अनेक गोष्टींबद्दल चाहत्यांना फार आपुलकी असते. अलीकडेच मराठमोळी अभिनेत्री वनिता खरात हिने अलिशान बिल्डिंगमध्ये नवं घर खरेदी केल्याची माहिती तिने चाहत्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली.
advertisement
2/7
१० बाय १० च्या घरातून थेट अलिशान बिल्डिंगमध्येच वनिताने नवं घर खरेदी केलं आहे. काही तासांपूर्वीच वनिताने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला. ज्यामध्ये तिने तिच्या घरातील प्रत्येक कोपरा, भिंत कशा पद्धतीने सजवला आहे, हे आपल्याला पाहायला मिळत आहे. अभिनेत्रीने कशा पद्धतीने तिचं घर सजवलंय जाणून घेऊया...
advertisement
3/7
वनिताने इन्स्टाग्रामवर होम टूरचा व्हिडिओ शेअर करताना कॅप्शन दिले की, "घर घेतल्यावर कदाचित घ्यायच्या आधीच माझं ठरलं होत की माझं घर कसं दिसेल कसं असेल, अगदी तसच्या तसं किंबहुना त्याहून खूप सुंदर घर सजवलंस तू विनायक. मी तुझ्या हातात मोकळा “फ्लॅट” दिला होता तू त्याचं प्रचंड सुंदर “घर” तयार केलंस, विनायक तुला प्रचंड घट्ट मिठी आणि आयुष्यभरासाठी प्रेम"
advertisement
4/7
अभिनेत्री वनिता खरातच्या घराची टूर सुरू होते ती, तिच्या घराच्या नेमप्लेट पासून... साधी पण सिंपल आणि आकर्षक अशा नेमप्लेटने सर्वांचेच लक्ष वेधले. साधी सिंपल नेमप्लेट मात्र खूपच एलिगेंट दिसते. त्यावर वनिता खरात, 2302 A असं लिहिलेलं दिसतंय. शिवाय, अभिनेत्रीकडे पुस्तकांचा खजिनाही पाहायला मिळतोय. घराच्या एका कोपऱ्यात तिने पुस्तकांसाठी खास रॅक उभारलाय.
advertisement
5/7
वनिताच्या घरात मोजकंच फर्निचर आणि इंटिरियर आहे. साध्या आणि सिंपल फर्निचरने अभिनेत्रीच्या घराची शोभा आणखीनच वाढली आहे. हॉलमध्ये साधा पण स्टायलिश सोफासेट, मोजकं फर्निचर आणि इनडोअर प्लांट्स ठेवण्यात आले आहेत. संपूर्ण घराची रंगसंगती व्हाईट, ग्रीन आणि ब्राऊन कलरच्या थीमनेच वापरण्यात आली आहे.
advertisement
6/7
अभिनेत्रीच्या घरातल्या हॉलमधील एका एका भिंतीवर मराठी फिल्म इंडस्ट्रीतील दिग्गज कलाकारांचे फोटो लावण्यात आले आहेत. ज्यामध्ये अभिनेत्री रंजना, लक्ष्मीकांत बेर्डे, आशा भोसले आणि अशोक सराफ यांचे फोटो लावण्यात आले आहेत. तर स्टायलिश पण सिंपल इंटिरियरने अभिनेत्रीचे घर आणखीनच शोभून दिसत आहे.
advertisement
7/7
वनिताचं हे नवं घर फारच सुंदर असून तिने तिचे घर सजवणाऱ्या इंटिरिअर डिझायनर विनायक तळेकर याचे कौतुक सुद्धा केले आहे. अभिनेत्रीच्या घराच्या होम टूरचा व्हिडिओ सध्या इन्स्टाग्रावर तुफान व्हायरल होत आहे. वनिताला तिच्या नव्या घरासाठी चाहत्यांसह सेलिब्रिटींकडून अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Vanita Kharat Home: हटके नेमप्लेट, मोजकंच फर्निचर अन् इंटिरियर; हास्यजत्रा फेम वनिता खरातचं सुटसुटीत घर पाहिलंत का?
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल