बॉलिवूडच्या दिग्गज निर्मात्याचा पोरगा अग्निदेव पाकिस्तान लीगमध्ये खेळणार, बेसप्राईज पण ठरली!
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
आयसीसी टी20 वर्ल्ड कप 2026 ला आजपासून सूरूवात झाली आहे.थोड्याच वेळ्यात भारताचा सामना देखील सूरू होणार आहे. तत्पुर्वी पाकिस्तानी सूपर लीग (PSL) मधून मोठी बातमी समोर आली आहे.
advertisement
1/7

आयसीसी टी20 वर्ल्ड कप 2026 ला आजपासून सूरूवात झाली आहे.थोड्याच वेळ्यात भारताचा सामना देखील सूरू होणार आहे. तत्पुर्वी पाकिस्तानी सूपर लीग (PSL) मधून मोठी बातमी समोर आली आहे.
advertisement
2/7
बॉलिवूड दिग्दर्शक आणि निर्माते विधू विनोद चोप्रा आणि चित्रपट समीक्षक अनुपमा चोप्रा यांचा मुलगा अग्नि देव चोप्रा हा पाकिस्तान सुपर लीगमध्ये खेळणार आहे. यासाठी आज त्याने पीएसएल 2026 च्या हंगामासाठी नोंदणी केली.
advertisement
3/7
अग्नि देव चोप्राने स्वतःची अमेरिकन नागरिक म्हणून नोंदणी केली आहे आणि त्याची माहिती पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या (पीसीबी) अधिकृत वेबसाइटवर मिळू शकते.
advertisement
4/7
अग्नि देव चोप्रा हा डावखुरा फलंदाज आणि उजव्या हाताचा ऑफस्पिन गोलंदाज आहे. त्याची मूळ किंमत पाकिस्तानी चलनानुसार 6,00,000 रुपये आहे, जी अंदाजे 2100 अमेरिकन डॉलर्स आणि 1 लाख 93 हजार रुपयांपेक्षा जास्त आहे.
advertisement
5/7
अग्नि देव चोप्रा 2025 पर्यंत भारतीय देशांतर्गत क्रिकेट खेळला आहे आणि रणजी ट्रॉफी, विजय हजारे ट्रॉफी आणि सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी (एसएमएटी) मध्येही त्याने स्थान मिळवले आहे. त्याने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून (बीसीसीआय) रणजी ट्रॉफी-प्लेट ग्रुपमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू म्हणून माधवराव सिंधिया 2023-24 जिंकला आहे.
advertisement
6/7
दरम्यान यापूर्वी परदेशी खेळाडूंनाही भारतातील देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळण्याची परवानगी होती. बीसीसीआयने 2024 मध्ये नियम बदलला आणि आता खेळाडूंना देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळण्यासाठी भारतीय पासपोर्ट आवश्यक असल्याचे बंधनकारक केले. अग्नि देव गेल्या वर्षीपर्यंत भारतातील देशांतर्गत क्रिकेटमध्ये मिझोरमसाठी खेळला होता.
advertisement
7/7
परदेशी लीगमध्ये खेळण्यासाठी खेळाडूंना भारतीय क्रिकेटमधून निवृत्ती घ्यावी लागते. अग्नि हा अमेरिकेचा नागरिक असल्याने तो पाकिस्तान सुपर लीग आणि जगभरातील इतर लीगमध्येही खेळू शकतो.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
बॉलिवूडच्या दिग्गज निर्मात्याचा पोरगा अग्निदेव पाकिस्तान लीगमध्ये खेळणार, बेसप्राईज पण ठरली!