TRENDING:

खूप वाट पाहिली, अखेर 'ती' वेळ येणार! तब्बल 30 वर्षांनी शनीचं गोचर, 'या' 4 राशींसाठी ठरणार 'गोल्डन डे'

Last Updated:
ज्योतिषशास्त्रात शनीच्या राशी परिवर्तनाला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. शनी हा सर्वात संथ चालणारा ग्रह असून तो एका राशीत सुमारे अडीच वर्षे राहतो. अशा प्रकारे संपूर्ण राशीचक्र पूर्ण करण्यासाठी त्याला 30 वर्षे लागतात.
advertisement
1/7
खूप वाट पाहिली! तब्बल 30 वर्षांनी शनीचं गोचर, 'या' 4 राशींसाठी ठरणार 'गोल्डन डे'
ज्योतिषशास्त्रात शनीच्या राशी परिवर्तनाला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. शनी हा सर्वात संथ चालणारा ग्रह असून तो एका राशीत सुमारे अडीच वर्षे राहतो. अशा प्रकारे संपूर्ण राशीचक्र पूर्ण करण्यासाठी त्याला 30 वर्षे लागतात. शनिदेव स्वराशीतून बाहेर पडून मेष राशीत प्रवेश करणार आहेत. तब्बल 30 वर्षांनंतर होणारा हा मेष राशीतील प्रवेश काही राशींसाठी सुवर्णकाळ घेऊन येणार आहे. 3 जून 2026 रोजी शनीचे मेष राशीत संक्रमण होईल. हे संक्रमण जवळजवळ 30 वर्षांनी होईल.
advertisement
2/7
मिथुन: मिथुन राशीच्या लोकांसाठी शनीचे हे गोचर अत्यंत लाभदायी ठरेल. तुमच्या करिअरमध्ये मोठी झेप घेण्याची हीच वेळ आहे. व्यवसायात नवीन भागीदारी फायदेशीर ठरेल आणि उत्पन्नाचे एकापेक्षा जास्त स्रोत निर्माण होतील. समाजात तुमची प्रतिष्ठा वाढेल.
advertisement
3/7
सिंह: सिंह राशीच्या जातकांसाठी हा काळ 'गोल्डन टाइम' असेल. तुमच्या साहसात वाढ होईल आणि नशिबाची पूर्ण साथ मिळेल. धार्मिक कार्यात रुची वाढेल आणि परदेश प्रवासाचे योग जुळून येतील. रखडलेली कायदेशीर कामे तुमच्या बाजूने सुटतील.
advertisement
4/7
तूळ: तूळ राशीच्या लोकांसाठी शनीचे हे गोचर वैवाहिक आणि व्यावसायिक जीवनात स्थिरता आणेल. जर तुम्ही भागीदारीत व्यवसाय करत असाल, तर तुम्हाला प्रचंड नफा मिळेल. नवीन घर किंवा वाहन खरेदी करण्याचे तुमचे स्वप्न या काळात पूर्ण होऊ शकते.
advertisement
5/7
कुंभ: कुंभ राशीच्या व्यक्तींना शनीच्या साडेसातीतून मोठी सवलत मिळणार असून त्यांचे रखडलेले पैसे परत मिळतील. तुमच्या कार्यक्षेत्रात वरिष्ठ तुमच्या कामावर खुश राहतील, ज्यामुळे पदोन्नतीचे मार्ग मोकळे होतील. जुन्या आजारातून सुटका मिळेल.
advertisement
6/7
आर्थिक सुबत्ता आणि गुंतवणूक: या 4 राशींच्या लोकांसाठी हा काळ गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम आहे. शेअर बाजार किंवा रिअल इस्टेटमध्ये केलेली जुनी गुंतवणूक आता भरघोस परतावा देईल. अचानक धनलाभाचे योग या काळात प्रबळ आहेत.
advertisement
7/7
शनीला प्रसन्न करण्याचा उपाय: या सुवर्णकाळाचा पूर्ण लाभ घेण्यासाठी आणि शनीची कृपा मिळवण्यासाठी दर शनिवारी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा. तसेच 'ॐ शं शनैश्चराय नमः' या मंत्राचा जप केल्याने अडथळे दूर होऊन प्रगतीचा वेग वाढतो. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
खूप वाट पाहिली, अखेर 'ती' वेळ येणार! तब्बल 30 वर्षांनी शनीचं गोचर, 'या' 4 राशींसाठी ठरणार 'गोल्डन डे'
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल