TRENDING:

प्रवाशांसाठी गुड न्यूज, पुणे–हडपसरहून झांसीसाठी 2 विशेष गाड्या धावणार, चेक करा वेळापत्रक

Last Updated:

रेल्वे प्रशासनाकडून एक महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे. पुण्यात अनेक इतर राज्यांतील नागरिक कामानिमित्त वास्तव्यास आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे: रेल्वे प्रशासनाकडून एक महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे. पुण्यात अनेक इतर राज्यांतील नागरिक कामानिमित्त वास्तव्यास आहेत. सणासुदीच्या काळात हे नागरिक मोठ्या संख्येने आपल्या गावी जात असल्याने रेल्वे वाहतुकीवर अतिरिक्त ताण येतो. ही बाब लक्षात घेऊन होळीच्या काळात प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाने पुणे आणि हडपसर येथून वीरांगना लक्ष्मीबाई झाशीपर्यंत मार्च महिन्यात दोन साप्ताहिक विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही गाड्यांमध्ये सेकंड एसीचा एक डबा, थर्ड एसीचे तीन डबे, स्लीपरचे सात डबे आणि सामान्य श्रेणीचे चार डबे असणार आहेत. ठराविक तारखांना एक विशेष गाडी पुण्याहून तर दुसरी हडपसरहून रवाना होणार आहे.
पुणे–हडपसरहून झांसीसाठी दोन विशेष गाड्या धावणार
पुणे–हडपसरहून झांसीसाठी दोन विशेष गाड्या धावणार
advertisement

पुणे स्टेशन ते झाशी 

पुणे–वीरांगना लक्ष्मीबाई झांसी विशेष गाडी क्रमांक 01921 ही 5 ते 26 मार्चदरम्यान दर गुरुवारी पुण्याहून दुपारी 3.15 वाजता सुटेल आणि पुढील दिवशी शुक्रवारी सकाळी 10 वाजता झांसी या ठिकाणी पोहोचेल. परतीसाठी वीरांगना लक्ष्मीबाई झांसी–पुणे विशेष गाडी क्रमांक 01922 ही 4 ते 25 मार्चदरम्यान दर बुधवारी झांसी येथून दुपारी 12.50 वाजता सुटेल आणि पुढील दिवशी गुरुवारी सकाळी 11.35 वाजता पुणे येथे पोहोचेल. ही विशेष गाडी दौंड कॉर्ड लाईन, अहिल्यानगर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, खंडवा, इटारसी, नर्मदापुरम, राणी कमलापती, विदिशा, बीना आणि ललितपूर या स्थानकांवर थांबणार आहे.

advertisement

जॉबसोबत स्ट्रॉंग मॅन झाला साहिल, पावर लिफ्टिंगमध्ये केली कमाल, पटकावले 2 गोल्ड मेडल

View More

हडपसर स्टेशन ते झाशी

हडपसर–वीरांगना लक्ष्मीबाई झांसी विशेष गाडी क्रमांक 01923 ही 8 ते 29 मार्चदरम्यान दर रविवारी रात्री 7.10 वाजता हडपसर येथून सुटेल आणि पुढील दिवशी सोमवारी दुपारी 3 वाजता झांसी येथे पोहोचेल. परत येण्यासाठी वीरांगना लक्ष्मीबाई झांसी–हडपसर विशेष गाडी क्रमांक 01924 ही 7 ते 28 मार्चदरम्यान दर शनिवारी रात्री 7.40 वाजता झांसीहून सुटेल आणि पुढील दिवशी रविवारी सायंकाळी 4.30 वाजता हडपसर येथे पोहोचेल. ही विशेष गाडी जाण्या-येण्यासाठी दौंड कॉर्ड लाईन, अहिल्यानगर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, इटारसी, राणी कमलापती आणि बीना या स्थानकांवर थांबणार आहे.

advertisement

दोन विशेष गाड्यांचा कालावधी वाढवला

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
कमी भांडवलात सुरू करा तेल घाणा व्यवसाय, मिळेल नफाच नफा, संपूर्ण माहितीचा Video
सर्व पहा

प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन आणखी दोन विशेष गाड्यांचा कालावधी वाढवण्यात आला आहे. दौंड–अजमेर वीकली विशेष गाडी क्रमांक 09626 ही आता 27 मार्चपर्यंत, तर अजमेर–दौंड वीकली विशेष गाडी क्रमांक 09625 ही 26 मार्चपर्यंत चालवली जाणार आहे. तसेच खडकी–हिसार वीकली विशेष गाडी क्रमांक 04726 ही 30 मार्चपर्यंत, तर हिसार–खडकी विशेष गाडी क्रमांक 04725 ही 29 मार्चपर्यंत चालवली जाणार आहे. या निर्णयामुळे सणासुदीच्या काळात प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

advertisement

मराठी बातम्या/पुणे/
प्रवाशांसाठी गुड न्यूज, पुणे–हडपसरहून झांसीसाठी 2 विशेष गाड्या धावणार, चेक करा वेळापत्रक
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल