Manasi Naik : घटस्फोटानंतर पुन्हा लग्न करतेय मानसी नाईक? प्रेमाची कबुली देत म्हणाली 'कोणीतरी आहे जे...'
- Published by:Nishigandha Kshirsagar
Last Updated:
आपल्या नृत्य आणि अभिनयानं प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री म्हणजे मानसी नाईक. मानसी नाईक तिच्या घटस्फोटामुळं चांगलीच चर्चेत आली होती. तिने आपल्या एक्स पतीवर गंभीर आरोप केले होते. गेले अनेक दिवस कोर्टात ही केस चालू होती, पण काही महिन्यांपूर्वीच मानसीचा घटस्फोट झाला. आता मानसी पुन्हा लग्न करण्यासाठी सज्ज झाली आहे. अभिनेत्रीनं नुकतंच प्रेमाची जाहीर कबुली दिली आहे.
advertisement
1/8

आपल्या नृत्य आणि अभिनयानं प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री म्हणजे मानसी नाईक. काही महिन्यांपूर्वीच मानसीचा घटस्फोट झाला. आता मानसी पुन्हा लग्न करण्यासाठी सज्ज झाली आहे. अभिनेत्रीनं नुकतंच प्रेमाची जाहीर कबुली दिली आहे.
advertisement
2/8
मानसी तिच्या वाढदिवशी पॅरिसला पोहोचली होती. अभिनेत्रीचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. तिथे तिच्यासोबत नक्की कोण होतं असा प्रश्न चाहत्यांना पडला होता.
advertisement
3/8
मानसीनं एक स्टोरी शेअर केली होती, त्यात तिच्यासोबत एका मुलाबरोबरचा फोटो होता. आता हा मुलगा नक्की कोण याचं उत्तर मानसीने दिलं आहे. नुकतंच हंच मीडियाला दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्रीनं हा खुलासा केला आहे.
advertisement
4/8
वाढदिवसाबद्दल बोलताना मानसी म्हणाली, 'मी माझ्याबरोबर वाढदिवस साजरा केला. एक तर मी आहे आणि प्रेमामध्ये मला पूर्ण करणारीही ‘मी’ आहे. त्या ‘मी’बद्दल मी नक्कीच लवकर सांगेन.' असा खुलासा तिने केला आहे.
advertisement
5/8
मानसी पुढे म्हणाली, 'पॅरिसचं प्रेमळ वातावरण होतं. खूप छान वाटलं. तिथे मला सुंदर वेळ दिलाय कोणीतरी. मला फॉसिल वॉच मिळालं. त्याच्यावर काहीतरी स्पेशल कोरलंय.'
advertisement
6/8
'तर मला सुंदर वेळ देणाऱ्या व्यक्तीचं नाव मी लवकरच गुलदस्त्यातून बाहेर काढेन. पण बरं वाटलं की, असा कोणीतरी आहे. जो तुमच्या चेहऱ्यावरचं हास्य बघायला काहीही करू शकतो.' असं म्हणत मानसीने पुन्हा प्रेमात पड्ल्याची कबुली दिली आहे.
advertisement
7/8
तसंच मानसी लग्नानंतर भारतात नाही जर्मनीमध्ये स्थित होणार असल्याचंही ती म्हणाली.
advertisement
8/8
मानसीचा होणारा नवरा शास्त्रज्ञ असल्याचं बोललं जातंय. मानसीच्या त्या स्पेशल व्यक्तीविषयी जाणून घेण्यासाठी चाहते आतुर झाले आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Manasi Naik : घटस्फोटानंतर पुन्हा लग्न करतेय मानसी नाईक? प्रेमाची कबुली देत म्हणाली 'कोणीतरी आहे जे...'