TMKOC : 'तारक मेहता...' च्या या कलाकारांचं खऱ्या आयुष्यातही आहे एकमेकांशी नातं
- Published by:Priya Lad
Last Updated:
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : तारक मेहता का उल्टा चश्मा या मालिकेतील काही कलाकार फक्त पडद्यावरच नाही तर खऱ्या आयुष्यातही एकमेकांचे नातेवाईक आहेत.
advertisement
1/9

तारक मेहता का उल्टा चश्मा 2008 साली सुरू झालेली ही कॉमेडी सीरिअल. गेली 17 वर्षे लोकांना हसवते आहे. या मालिकेत हसवता हसवता महत्त्वाचे असे कौटुंबिक आणि सामाजिक संदेशही दिले जातात. या मालिकेचं एक वैशिष्ट्य म्हणजे मालिकेतील कालाकारांमध्ये असलेलं रिल लाइफ नातं रिअल नातंही वाटतं. पण तुम्हाला विश्वास बसणार नाही. या मालिकेतील काही कलाकारांमध्ये खरंच असं नातं आहे.
advertisement
2/9
यातील पहिली जोडी म्हणजे दया आणि सुंदर... मेरा वीरा मेरा वीरा म्हणत सतत आपल्या भावाचं कौतुक करणारी दया आणि मेरी बहना म्हणत दयाला प्रेमाने हाक मारणारा सुंदर. या भावाबहिणीच्या जोडीची ऑनस्क्रिन केमिस्ट्री इतकी जबरदस्त आहे की त्यांच्यात लहानपणापासूनच नातं असावं असं वाटतं.
advertisement
3/9
पण तुम्हाला माहिती नसेल तर खरंच तसं आहे. ते दोघं खऱ्या आयुष्यातही भाऊबहीण आहेत. दयाची भूमिका करणारी दिशा वकानी आणि सुंदरलाल बनलेला मयूर वकानी दोघंही सख्खे भावंडं आहेत.
advertisement
4/9
दिशाशी रक्ताचं नातं असलेला आणखी एक कलाकार 'तारक मेहता'मध्ये दिसला आहे. जे दिशाचे वडील आहेत. त्यांनी छोटीशी भूमिका केली पण ती कायम लक्षात राहिल अशी आहे.
advertisement
5/9
चंपकलालचा मित्र मावची चेडा, ज्याला जेठालाल आणि दया काकाजी म्हणून हाक मारतात ते भीम वकानी आहेत. ते एक अनुभवी थिएटर आर्टिस्ट आहेत.
advertisement
6/9
'तारक मेहता'मध्ये दया-सुंदरप्रमाणे आणखी एका भावंडाची जोडी आहे. गोकुलधामच्या टप्पू सेनामधील टप्पू आणि गोगी, यांच्या मैत्रीचं नेहमीच कौतुक होतं. ऑनस्क्रिन एकमेकांचे मित्र असलेले टप्पू आणि गोगी खऱ्या आयुष्यात एकमेकांचे चुलत भाऊ आहेत.
advertisement
7/9
तारक मेहतामध्ये सुरुवातीला टप्पूची भूमिका करणारा भव्य गांधी आणि गोगी असलेला समय शाह चुलत भाऊ आहेत. दोघांनाही सोशल मीडियावर अनेक सण एकत्र साजरे करताना दिसले आहेत, कौटुंबिक कार्यक्रमातही त्यांनी एकत्र हजेरी लावली आहे.
advertisement
8/9
तारक मेहतामधील आणखी एक इंटरेस्टिंग पात्र म्हणजे बाघा, जो आपल्या अनोख्या चालीसाठी ओळखला जातो. हा अभिनेता तन्मय वेकारिया. खूप कमी लोकांना माहिती आहे की त्याचे वडीलही 'तारक मेहता'चा भाग राहिला आहेत.
advertisement
9/9
तन्मयचे वडील अरविंद वकारिया यांनी तारक मेहतामध्ये छोट्या भूमिका केल्या आहेत. एका एपिसोडमध्ये ते सोनार बनले होते. ज्यात त्यांनी आत्माराम भिडेचं सोनं बळकावण्याचा प्रयत्न केला होता.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
TMKOC : 'तारक मेहता...' च्या या कलाकारांचं खऱ्या आयुष्यातही आहे एकमेकांशी नातं