वीकेंडला पार्टनरसोबत डेट नाईट प्लान करताय? 'या' रोमँटिक फिल्म्स वाढवतील तुमच्यातलं प्रेम, चुकूनही मिस करू नका
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Best Romantic Films For Date Night: सुट्टीच्या दिवशी अनेकांना घराबाहेर पडून भटकंती करण्यापेक्षा घरी बसून आवडीचं जेवण आणि आपल्या जोडीदारासोबत घालवणं सगळ्यात जास्त सुखद वाटतं. मग अशावेळी काय पाहावं हा प्रश्न हमखास पडतो.
advertisement
1/11

या धकाधकीच्या जीवनात आठवड्यातील सुट्टीच्या दिवशी आपल्या आवडत्या व्यक्तीसोबत वेळ घालवणं कोणाला आवडत नाही? पण अनेकांना घराबाहेर पडून भटकंती करण्यापेक्षा घरी बसून आवडीचं जेवण आणि आपल्या जोडीदारासोबत घालवणं सगळ्यात जास्त सुखद वाटतं.
advertisement
2/11
मग अशावेळी काय पाहावं हा प्रश्न हमखास पडतो. पण आता टेन्शन नाही. आज आम्ही तुमच्यासाठी अशा फिल्म्सची लिस्ट घेऊन आलोय, जे पाहिल्यानंतर तुमच्यातील प्रेम नक्कीच दुप्पट होईल.
advertisement
3/11
जर तुम्हाला काही हलकं-फुलकं पाहायचं असेल, तर रोमँटिक कॉमेडीसारखा दुसरा पर्याय नाही. तुम्ही 50 First Dates हा सिनेमा नक्की पाहू शकता. ही कथा अशा मुलीची आहे, जिची स्मृती दररोज जाते. पण तिचा जोडीदार हार न मानता तिला रोज नवनवीन पद्धतीने त्याच्या पुन्हा पुन्हा प्रेमात पाडतो. दोन्ही पात्रांमधील केमिस्ट्री पाहून तुमच्या चेहऱ्यावर नक्की हसू येईल.
advertisement
4/11
सँड्रा बुलक आणि रायन रेनॉल्ड्सची The Proposal ही फिल्म पाहून तुम्ही हसून हसून लोटपोट व्हाल. ही एका खोट्या साखरपुड्याची गोष्ट तुम्हाला फिल्मच्या शेवटापर्यंत खिळवून ठेवेल. ही फिल्म तुमची डेट नाईट आणखीनच इंटरेस्टिंग करेल.
advertisement
5/11
Crazy, Stupid, Love या फिल्ममध्ये प्रेमाचे वेगवेगळे रंग आणि गुंतागुंतीचे नातेसंबंध अत्यंत विनोदी पद्धतीने मांडले आहेत. यामध्ये वेगवेगळ्या कपल्सच्या प्रेमकहाण्या एकमेकांशी जोडलेल्या आहेत. ही फिल्म जितकी कॉमेडी आहे, तितकीच काळजाला भिडणारी आहे.
advertisement
6/11
मैत्रीचं प्रेमात कसं रूपांतर होतं, हे When Harry Met Sally या चित्रपटापेक्षा चांगलं कोणीच सांगू शकत नाही. तुम्हीही प्रेमात पडण्याआधी एकमेकांचे चांगले मित्र असाल, तर तुम्हाला या फिल्ममधील गोष्ट नक्कीच आवडेल.
advertisement
7/11
जर तुम्हाला खऱ्याखुऱ्या आणि मनात खोलवर रुजणाऱ्या प्रेमकथा आवडत असतील, तर The Notebook हा चित्रपट प्रेमी जोडप्यांसाठी परफेक्ट आहे. ही कथा तुम्हाला रडवेलही आणि प्रेमावरचा विश्वासही वाढवेल.
advertisement
8/11
जर तुम्हाला साध्या प्रेमकथांपेक्षा काहीतरी वेगळं पाहायचं असेल, तर Eternal Sunshine of the Spotless Mind हे एक मास्टरपीस आहे. आठवणी आणि प्रेम यांच्यातील गुंतागुंत यात अनोख्या पद्धतीने मांडली आहे. हा चित्रपट पाहिल्यावर तुम्ही बराच वेळ त्याबद्दल चर्चा कराल.
advertisement
9/11
रोमान्स नको असेल आणि थोडा थरार हवा असेल, तर Taken किंवा Baby Driver हे चित्रपट तुमच्या डेट नाईटला एक वेगळाच रंग देतील.
advertisement
10/11
काही सिनेमे कधीच जुने होत नाहीत. जर तुम्हाला शांत आणि सुखावणारा अनुभव हवा असेल, तर Notting Hill आवर्जून पाहा. या फिल्ममध्ये एक सामान्य मुलगा आणि एक जगप्रसिद्ध स्टार यांच्यातील साधी पण मनाला भिडणारी कहाणी दाखवण्यात आली आहे.
advertisement
11/11
A Star Is Born या फिल्ममध्ये संगीत, करिअर आणि प्रेम यांचा संघर्ष यात लेडी गागा आणि ब्रॅडली कुपरने अप्रतिम साकारला आहे. नात्यांची किंमत आणि एकमेकांना आधार देणं म्हणजे काय, हे All The Bright Places हा चित्रपट शिकवतो.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
वीकेंडला पार्टनरसोबत डेट नाईट प्लान करताय? 'या' रोमँटिक फिल्म्स वाढवतील तुमच्यातलं प्रेम, चुकूनही मिस करू नका