TRENDING:

Aajache Rashibhavishya: प्रेम, पैसा मिळणार की संकट संधी गिळणार? रविवारी तुमच्या नशिबात काय? आजचं राशीभविष्य

Last Updated:
Daily Horoscope: आजचा रविवार मेष ते मीन 12 राशींसाठी कसा असेल? पुण्यातील ज्योतिषी अशोक पाटील यांच्याकडून आजचं राशीभविष्य जाणून घेऊ.
advertisement
1/13
Aajache Rashibhavishya: प्रेम, पैसा मिळणार की संकट संधी गिळणार? रविवारी तुमच्या नशिबात काय? आजचं राशीभविष्य
मेष राशीच्या व्यक्तीसाठी आजचा दिवस चांगला जाणार आहे. कामातून ब्रेक घ्याल. अचानक आनंदाची बातमी मिळण्याची दाट शक्यता आहे. कुटुंबासोबत वेळ घालवा. प्रवासाचा योग आहे. एकूणच आजचा दिवस तुमचा समाधानकारक असणार आहे.
advertisement
2/13
वृषभ राशीसाठी आजचा रविवार उत्तम जाणार आहे. वृषभ राशीचा स्वामी शुक्र द्वादश स्थानात आहे तसेच चंद्राचे तुळ राशीत संक्रमण सुरु आहे. त्यामुळे अनेक चांगल्या घटना तुमच्यासोबत होतील. नोकरी किंवा व्यवसायाच्या ठिकाणी योजना पूर्ण होतील. अचानक आनंदाची बातमी मिळेल. आरोग्याकडे लक्ष द्या.
advertisement
3/13
मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस ठीक असणार आहे. मिथुन राशीचा स्वामी बुध नवम स्थानात असून चंद्र तुळ राशीत आहे. त्यामुळे तुम्ही जे काम कराल त्यात यश मिळेल. आर्थिक खर्च वाढू शकतो. त्यामुळे पैसे जपून खर्च करा.
advertisement
4/13
कर्क राशीसाठी आजचा दिवस उत्तम योग घेऊन येत आहे. तुमच्या राशी पासून द्वादश स्थानात मिथुन राशीतील गुरु आणि चतुर्थ स्थानातील चंद्र एकत्र आलेले आहे. त्यामुळे या योगामुळे तुम्हाला मानसन्मान, यश, प्रसिद्धी मिळेल. योजना पूर्ण होतील. वरिष्ठांकडून कौतुक होईल. कुटुंबात देखील आनंदाचे वातावरण असेल.
advertisement
5/13
सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस समाधानकारक असणार आहे. नोकरी किंवा व्यवसायाच्या ठिकाणी नवीन संधी निर्माण होतील. दिवसभरात महत्त्वाच्या व्यक्तीची भेट होईल. यांचा फायदा देखील तुम्हाला होणार आहे. सिंह राशीचा स्वामी सूर्य हा कुंभ राशीत अष्टम चंद्र चतुर्थ स्थानात आहे. यामुळे भाग्यवृद्धीचे योग आहेत. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल.
advertisement
6/13
कन्या राशीसाठी आजच्या दिवशी आर्थिक बजेट कोलमडणार आहे. आज अनेक ठिकाणी तुमचे पैसे खर्च होणार आहेत. त्यामुळे शक्य तेवढे पैसे वाचवण्याचा प्रयत्न करा. कामाच्या ठिकाणी यश मिळेल. तसेच येत्या काळात व्यवसायामध्ये चांगला नफा होईल. प्रवासाचा योग आहे.
advertisement
7/13
तुळ राशीच्या व्यक्तीसाठी आजचा दिवस ठीक असेल. नोकरी किंवा व्यवसायाच्या ठिकाणी कामाचा अतिताण जाणवू शकतो. नियोजनाने आणि फोकसने काम करा. छोट्या मोठ्या अडचणीचा सामना करावा लागू शकतो. कामाच्या धावपळीत आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका.
advertisement
8/13
वृश्चिक राशीसाठी आजचा दिवस कधी खुशी कधी गम अशा पद्धतीचा असणार आहे. कामाच्या ठिकाणी नवीन संधी निर्माण होतील त्याचा फायदा उचला. अधिक पैसे खर्च होण्याची शक्यता आहे. कुटुंबामध्ये गैरसमज होण्याची शक्यता आहे त्यामुळे परिस्थिती शांततेने हाताळा.
advertisement
9/13
धनु राशीसाठी आजचा दिवस उत्तम आहे. अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. नवीन योजना आखण्यासाठी हा दिवस योग्य आहे. खर्च जरा जास्त होण्याची शक्यता आहे, त्यामुळे गरजेपेक्षा जास्त खर्च टाळावा. मित्र आणि कुटुंबीयांचा आधार मिळेल.
advertisement
10/13
आज कामात चांगली प्रगती होईल. पण जास्त ताण घेऊ नका. कामाचे नियोजन नीट कराल, तर दिवस आरामदायक आणि फायद्याचा जाईल. पैशांच्या बाबतीत सावध राहा. अनावश्यक खर्च टाळा आणि गरजेच्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करा. घरातील वातावरण ठीक राहील.
advertisement
11/13
कुंभ राशी: आज तुमच्या कल्पकतेला चालना मिळेल. नवीन प्रोजेक्ट्समध्ये काम करताना यश मिळेल. मित्र आणि नातेवाईक मदतीसाठी उभे राहतील, त्यामुळे अडचणी पटकन सोडवता येतील. पैशांच्या बाबतीत सावधगिरी बाळगा. मुलाकडून आनंदाची बातमी मिळेल.
advertisement
12/13
मीन राशीसाठी आजचा दिवस चांगला जाणार आहे. कामाच्या ठिकाणी तुमचं कौतुक होईल. मीन राशीचा स्वामी गुरु बृहस्पति मिथुन राशीत असल्याने प्रगती चांगल्या प्रकारे होण्याचे संकेत आहेत. आज रविवार असून देखील तुमचा दिवस कामात जाणार आहे. त्यामुळे काही प्रमाणात चिडचिड होऊ शकते. स्वतःसाठी वेळ द्या. 
advertisement
13/13
टीप - आजचे राशीभविष्य तुमच्या नावाच्या पहिल्या अक्षरावरून येणाऱ्या राशीवर आधारित आहे. हे सर्वसामान्य राशीभविष्य आहे. अचूक आणि वैयक्तिक राशीभविष्यासाठी जवळच्या ज्योतिषांचा सल्ला घ्या. 
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Aajache Rashibhavishya: प्रेम, पैसा मिळणार की संकट संधी गिळणार? रविवारी तुमच्या नशिबात काय? आजचं राशीभविष्य
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल