स्क्रीनवर अभिनेत्रीवर केला अत्याचार, शूटिंगनंतर ढसाढसा रडला अभिनेता; सीरिज OTT वर टॉप ट्रेंडिंग, तुम्ही पाहिली का?
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Chiraiya on Jio Hotstar: 'चिरैया' या सीरिजमध्ये अरुणने पूजासोबत केलेली क्रूरता पाहून प्रेक्षकांचा राग अनावर झाला आहे. पण प्रत्यक्षात तो सीन शूट करताना अभिनेता सिद्धार्थ शॉ याची अवस्था काय झाली होती, याचा खुलासा अभिनेत्री प्रसन्ना बिष्ट हिने केला आहे.
advertisement
1/8

ओटीटीवर सध्या एका वेबसीरिजने धुमाकूळ घातला आहे. भारतीय पितृसत्ताक पद्धती आणि त्यामुळे महिला कशाप्रकारे बळी पडतात याचे तंतोतंत वर्णन करणाऱ्या 'चिरैया' या सीरिजने सध्या प्रेक्षकांना विचार करायला भाग पाडलं आहे.
advertisement
2/8
जिओ हॉटस्टारवर रिलीज झालेल्या या सीरिजने एका अशा विषयाला हात घातला आहे, ज्यावर बोलायलाही लोक कचरतात. मॅरिटल रेप म्हणजेच वैवाहिक बलात्कार या गंभीर विषयावर बनलेली ही सीरिज सध्या चर्चेचा विषय ठरली आहे.
advertisement
3/8
मात्र, नुकतंच एका मुलाखतीत या सीरिजमध्ये प्रमुख भूमिकेत असलेल्या कलाकारांनी असा काही खुलासा केला आहे, जो ऐकून खुद्द प्रेक्षक शॉक झाले आहेत. या सीरिजमधील मुख्य पात्र अरुण आणि पूजा यांच्यातील लग्नाच्या पहिल्या रात्रीचा थरार प्रेक्षकांसोबत शेअर केला आहे.
advertisement
4/8
स्क्रीनवर अरुणने पूजासोबत केलेली क्रूरता पाहून प्रेक्षकांचा राग अनावर झाला आहे. पण प्रत्यक्षात तो सीन शूट करताना अभिनेता सिद्धार्थ शॉ याची अवस्था काय झाली होती, याचा खुलासा अभिनेत्री प्रसन्ना बिष्ट हिने केला आहे.
advertisement
5/8
'चिरैया' या सीरिजमध्ये सिद्धार्थ शॉने 'अरुण' ही नकारात्मक भूमिका साकारली आहे. सीरिजमधील वेडिंग नाईटचा सीन इतका भयानक होता की, प्रेक्षकांना अरुणची प्रचंड चीड आली. पण या सीनच्या शूटिंगदरम्यान सिद्धार्थची अवस्था मात्र पूर्णपणे वेगळी होती.
advertisement
6/8
अभिनेत्री प्रसन्ना बिष्टने एका मुलाखतीत सांगितलं की, "सिद्धार्थसाठी तो सीन करणं अजिबात सोपं नव्हतं. सेटवर इंटिमसी को-ऑर्डिनेटर असूनही, जेव्हा प्रत्यक्ष शूट सुरू झालं, तेव्हा सिद्धार्थ ढसाढसा रडू लागला. तो अक्षरशः थरथर कापत होता. तो इतका घाबरला होता की आम्हाला शूटिंग थांबवून त्याला शांत करावं लागलं."
advertisement
7/8
या अनुभवाबद्दल बोलताना सिद्धार्थ भावूक झाला. तो म्हणाला, "मला आजही समजत नाहीये की माझ्यासोबत नक्की काय घडलं होतं. कदाचित माझ्या आतील माणुसकीला तो सीन पचवणं कठीण जात होतं. मी आणि प्रसन्ना एकमेकांना गेल्या ५ वर्षांपासून ओळखतो. आम्ही रिहर्सल केली होती, सगळं ठरलं होतं, पण जेव्हा शूट सुरू झालं, तेव्हा थेट माझ्या डोळ्यात पाणी आलं. त्या क्षणी मला नेमकं काय होतंय हेच कळत नव्हतं."
advertisement
8/8
२० मार्च २०२६ रोजी प्रदर्शित झालेली ही सहा एपिसोडची सीरिज प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. रिलीजच्या १४ दिवसांनंतरही 'चिरैया' ट्रेंडिंग लिस्टमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे. वैवाहिक नात्यातील संमती आणि जबरदस्ती यातील पुसट रेषा या सीरिजमध्ये प्रभावीपणे मांडण्यात आली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
स्क्रीनवर अभिनेत्रीवर केला अत्याचार, शूटिंगनंतर ढसाढसा रडला अभिनेता; सीरिज OTT वर टॉप ट्रेंडिंग, तुम्ही पाहिली का?