हातावर मेहंदी, मनात प्रेम! कोकणहार्टेड गर्लच्या लग्नविधींना सुरूवात, अहोंसाठी लिहली खास पोस्ट
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
अंकिता वालावलकर आणि कुणाल यांचा लग्नसोहळा देवबाग, कोकण येथे होणार आहे. मेहंदी सोहळ्याचे फोटो अंकिताने शेअर केले आहेत.
advertisement
1/7

‘बिग बॉस मराठी’मध्ये आपल्या साधेपणाने आणि प्रांजळ स्वभावाने प्रेक्षकांची मने जिंकणारी अंकिता वालावलकर लवकरच नव्या आयुष्याची सुरुवात करणार आहे. काही दिवसांपूर्वीच तिने तिच्या लग्नाची घोषणा केली होती आणि आता तिच्या घरी लग्नाच्या तयारीला जोरदार सुरुवात झाली आहे.
advertisement
2/7
अंकिता आणि कुणाल यांचा लग्नसोहळा निसर्गरम्य देवबाग, कोकण येथे पार पडणार आहे. तिच्या कुटुंबीयांसह, सासरचे नातेवाईक, मित्रमंडळी आणि काही प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सही या खास सोहळ्यासाठी कोकणात पोहोचले आहेत.
advertisement
3/7
लग्नाचा उत्साह आणि आनंद सगळीकडे दिसून येत आहे. नुकताच अंकिता आणि कुणालच्या मेहंदी सोहळ्याचा शानदार जल्लोष साजरा करण्यात आला.
advertisement
4/7
अंकिताने आपल्या मेहंदी सोहळ्याचे खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये नारिंगी रंगाचा सुंदर ड्रेस घातलेली अंकिता, हातात बटवा घेतलेली अतिशय मोहक दिसत आहे. तर कुणालनेही आपल्या शेरवानीसोबत तिच्या पोशाखाला मॅचिंग असलेली ओढणी घेतली आहे.
advertisement
5/7
दोघांचाही लूक अगदी परफेक्ट दिसतोय आणि त्यांच्या जोडीवर चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. मेहंदी सोहळ्याच्या खास क्षणी, अंकिताने एक भावूक पोस्ट शेअर केली आहे.
advertisement
6/7
"तू अशी आहेस, तू तशी आहेस, तू काही करू शकत नाहीस असं बोलणाऱ्या गर्दीत जेव्हा कोणी हे म्हणतं… 'तू जशी आहेस तशी फार सुंदर आहेस, तू प्रेमळ आहेस आणि माझं तुझ्यावर प्रचंड प्रेम आहे. तू जशी आहेस तशीच कायम राहा कारण, मी तुझ्या असण्यावर प्रेम करतो’... तेव्हा वाटतं की आयुष्याला खरा अर्थ आहे. त्या आयुष्याची पहिली पायरी आम्ही एकत्र चढतोय. आशीर्वाद असू द्या! #BeginningOfForever"
advertisement
7/7
अंकिता आणि कुणालचे लग्न अवघ्या दोन दिवसांत संपन्न होणार आहे. हा खास दिवस त्यांच्या आयुष्यात आनंद, प्रेम आणि नवीन सुरुवातीचा दिवस असणार आहे. तिच्या चाहत्यांना आणि जवळच्या मंडळींना या नव्या जोडप्यासाठी शुभेच्छा देण्यासाठी आतुरता आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
हातावर मेहंदी, मनात प्रेम! कोकणहार्टेड गर्लच्या लग्नविधींना सुरूवात, अहोंसाठी लिहली खास पोस्ट