TRENDING:

'माझी बायको फेमस, मी तर फक्त...', माधुरीसोबतच्या तुलनेमुळे डॉक्टर नेने दुःखी? हरवली स्वतःची ओळख

Last Updated:
Madhuri Dixit Husband Dr. Shriram Nene : माधुरी दीक्षितच्या लोकप्रियतेमुळे डॉक्टर नेने यांनाही सेलेब्रिटी सारखी वागणूक मिळते. एका मुलाखतीत नेने यांनी आपल्या मनातील गोष्ट पहिल्यांदाच शेअर केली आहे.
advertisement
1/6
'माझी बायको फेमस, मी तर फक्त...', माधुरीसोबतच्या तुलनेमुळे डॉक्टर नेने दुःखी?
भारतीय मनोरंजन विश्वात ९० च्या दशकात माधुरीने गाजवलं. तिने अक्षरशः इंडस्ट्रीवर राज्य केलं. सध्या माधुरी कोणत्याही मोठ्या प्रोजेक्ट्समध्ये दिसत नसली, तरीही तिची फॅन-फॉलोविंग जबरदस्त आहे.
advertisement
2/6
माधुरीने करिअरच्या पीकवर असतानाच डॉक्टर नेने यांच्याशी लग्न करून सगळ्यांनाच धक्का दिला. तिच्या लग्नाच्या बातमीमुळे तिच्या अनेक चाहत्यांचा हिरमोड झाला. लग्नानंतर माधुरी परदेशात स्थायिक झाली. आता बऱ्याच वर्षांनी माधुरी भारतात परतली आहे.
advertisement
3/6
माधुरीच्या कमबॅकमध्ये तिचे पती डॉक्टर नेने यांनी तिला खूप साथ दिली. दरम्यान, एका मुलाखतीत नेने यांनी आपल्या मनातील गोष्ट पहिल्यांदाच शेअर केली आहे. ते म्हणाले की कधीकधी लोक त्यांना त्यांच्या पत्नीच्या तुलनेत कमी समजतात.
advertisement
4/6
माधुरी दीक्षितमुळे डॉक्टर नेने यांनाही सेलिब्रिटीसारखी वागणूक मिळते. यावरच त्यांनी आपले विचार व्यक्त केले आहेत. ते असेही म्हणाले की आपल्याला मिळत असलेल्या लोकप्रियतेचा वापर आपण चांगल्या कामांसाठी करायला हवा.
advertisement
5/6
डॉ. दीपक चोप्रा यांच्यासोबत एका व्यासपीठावर चर्चा करत असताना डॉ. नेने म्हणाले, "माझी बायको फेमस आहे. मी फक्त इथे फिरायला आलो आहे." पण, "आपल्या सर्वांना ज्या इम्पोस्टर सिंड्रोमचा सामना करावा लागतो त्या पलीकडे, त्यात अनेक लोकांच्या जीवनात बदल घडवून आणण्याची शक्ती आहे. तुमच्यापैकी प्रत्येकजण किती शक्तिशाली आहे हे कधीही कमी लेखू नका."
advertisement
6/6
त्यांनी सांगितले की ते स्वतः भारतातील एक सेलिब्रिटी बनले आहेत. ते म्हणाले, "प्रत्येकाला माझ्यासोबत सेल्फी काढायचा आहे." "मी हे कसे हाताळू? प्रामाणिकपणे सांगायचे तर, मला त्यांच्याशी संवाद साधायचा आहे आणि ते आव्हानात्मक बनते."
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
'माझी बायको फेमस, मी तर फक्त...', माधुरीसोबतच्या तुलनेमुळे डॉक्टर नेने दुःखी? हरवली स्वतःची ओळख
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल