Weather Alert: कल्याण-डोंबिवलीत चढला पारा, ठाण्यात घामाच्या धारा, 24 तासांसाठी हवामान विभागाचा अलर्ट
- Reported by:GEETA PANDHARINATH GAIKAR
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Weather Alert in Marathi: महाराष्ट्रातील थंडीची तीव्रता कमी झाली असून हवामानात मोठे बदल जाणवत आहेत. कल्याण-डोंबिवलीसह ठाणे परिसरातील हवामान अपडेट जाणून घेऊ.
advertisement
1/5

महाराष्ट्रातील हवामानात फेब्रुवारीच्या मध्यावर मोठे बदल जाणवत आहेत. थंडीची तीव्रता कमी झाली असून तापमानाचा पारा चढत आहे. काही जिल्ह्यांत तापमान पस्तीशी पार गेलं असून नागरिकांना उन्हाच्या झळा सहन कराव्या लागत आहेत. आज कल्याण-डोंबिवलीसह ठाणे परिसरातील हवामान कसं असेल? जाणून घेऊ.
advertisement
2/5
ठाणे जिल्ह्यातील हवामान उष्ण आणि दमट असून, किमान तापमान 32- 34 अंश सेल्सिअसपर्यंत राहणार असून आज उकाडा जाणवेल. किमान तापमान 23-24 अंश सेल्सिअसपर्यंत राहील. दिवसभर उकाडा तर संध्याकाळी हवामान आंशिक ढगाळ राहू शकते.
advertisement
3/5
कल्याण-डोंबिवलीत हवामान प्रामुख्याने कोरडे, स्वच्छ आणि उबदार राहण्याची शक्यता आहे. शुक्रवारी किमान व कमाल तापमान किंचित वाढ होण्याची शक्यता असून ,कमाल तापमान 35-36 अंश सेल्सिअस, तर किमान तापमान 21 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. उन्हाचा तडाखा जाणवेल. पहाटे आणि रात्री हलकी थंडी असू शकते, पण दुपार उष्णता हैराण करेल.
advertisement
4/5
कल्याण-डोंबिवली ग्रामीण भागातील हवामान उबदार, स्वच्छ आणि कोरडे असेल, किमान तापमान 21अंश सेल्सिअस तर कमाल 36 अंश सेल्सिअस राहील. दिवसा तापमान अधिक असून दुपारी उष्णतेची लाट असल्याची स्थिती होईल. त्यामुळे बाहेर पडताना कॉटनचे हलके कपडे आणि पाणी सोबत ठेवावे.
advertisement
5/5
बदलापूरमधील तापमान गुरुवार पासून पुन्हा स्थिर होऊन अंशतः ढगाळ आणि उष्ण असेल. कमाल तापमान 37 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 22 अंश सेल्सिअस राहील. शहापूर आणि मुरबाड तालुक्यातील हवामान उष्ण व कोरडे राहील. कमाल तापमान 33-35अंश सेल्सिअस तर किमान तापमान 19-21 अंश सेल्सिअस असेल. तापमानात मोठी वाढ झाल्याने नागरिकांनी आरोग्याची योग्य ती काळजी घ्यावी.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Kalyan Dombivli/
Weather Alert: कल्याण-डोंबिवलीत चढला पारा, ठाण्यात घामाच्या धारा, 24 तासांसाठी हवामान विभागाचा अलर्ट