TRENDING:

हे चुकीचं...! बिन लग्नाची गोष्ट रिलीज होताच निवेदिता सराफ झाल्या नाराज, पण का?

Last Updated:
अभिनेत्री निवेदिता सराफ यांचा बिन लग्नाची गोष्ट हा सिनेमा नुकताच रिलीज झाला आहे. पण सिनेमाच्या रिलीजनंतर त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. काय आहे त्यामागचं कारणं?
advertisement
1/7
हे चुकीचं...!  'बिन लग्नाची गोष्ट' रिलीज होताच निवेदिता सराफ नाराज, पण का?
मराठी सिनेमांनी हव्या तशा स्क्रिन्स मिळत नाहीत अशी तक्रार गेली अनेक वर्ष सुरू आहे. अशातच सप्टेंबर महिन्यात एक नाही एकाच दिवशी तीन तीन मराठी सिनेमे रिलीज करण्याचा निर्णय मराठी निर्मात्यांनी घेतला आहे.
advertisement
2/7
12 सप्टेंबर आणि 19 सप्टेंबरच्या शुक्रवारी प्रत्येकी तीन तीन मराठी सिनेमा रिलीज होत आहेत. 12 सप्टेंबरला 'दशावतार', 'बिन लग्नाची गोष्ट' आणि 'आरपार' हे तीन सिनेमे रिलीज झालेत.
advertisement
3/7
तर 19 सप्टेंबरच्या शुक्रवारी 'कुर्ला टू वेंगुर्ला', 'आतली बातमी फुटली' आणि 'अरण्य' असे तीन मराठी सिनेमे रिलीज होत आहेत.
advertisement
4/7
एका दिवशी किंवा एका आठवड्यात नेमके किती सिनेमे पाहायचा असा प्रश्न प्रेक्षकांना पडला. सोशल मीडियावरही अनेकांनी याबद्दल भाष्य केलंय.
advertisement
5/7
दरम्यान ज्येष्ठ अभिनेत्री निवेदिता सराफ यांनीही याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. 12 सप्टेंबरच्या शुक्रवारी निवेदिता सराफ यांची महत्त्वाची भूमिका असलेला 'बिन लग्नाची गोष्ट' हा सिनेमा देखील रिलीज झाला आहे. पण इतर सिनेमांच्या तुलनेत या सिनेमानं सर्वात कमाई कमाई केल्याचं दिसतंय.
advertisement
6/7
नवशक्तीला दिलेल्या मुलाखतीत बोलताना निवेदिता सराफ म्हणाल्या, "एकाच दिवशी एवढे सिनेमे रिलीज होणं मला वैयक्तिकरित्या चुकीचं वाटतं."
advertisement
7/7
"ऑलरेडी सध्या पिक्चर चालत नाही आहेत. त्यामुळे तुम्ही पर्सनली एकमेकांशी बोललं पाहिजे. आपण निर्माते म्हणून एकत्र नाही आहोत. जे एकत्र येऊन करण्याची गरज आहे."
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
हे चुकीचं...! बिन लग्नाची गोष्ट रिलीज होताच निवेदिता सराफ झाल्या नाराज, पण का?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल