भावाच्या लग्नात सुचली बिझनेसची आयडिया, वर्षभरात मालामाल, प्राजक्ताच्या फार्महाऊसचं 1 दिवसाचं भाडं किती?
- Published by:Minal Gurav
Last Updated:
prajakta mali farm house one day rent : अभिनेत्री प्राजक्ता माळीचं कर्जत येथील फार्महाऊस चांगलेच चर्चेत आहे. तुम्हीही तिथे जाऊ शकता. पण प्राजक्ताच्या फार्महाऊसचं एका दिवसाचं भाडं किती आहे माहितीये?
advertisement
1/9

अभिनेत्री प्राजक्ता माळी ही तिच्या 'फुलवंती' सिनेमामुळे चर्चेत आहे. प्राजक्ता अभिनेत्रीबरोबर सक्सेसफुल बिझनेसवुमन आहे. आता तर ती निर्मातीही बनली आहे.
advertisement
2/9
प्राजक्ताने 'जुळून येती रेशीमगाठी' या मालिकेतून टेलिव्हिजनवर पदार्पण केलं. त्यानंतर तिने काही मालिका आणि सिनेमे केले मात्र त्यात तिला हवं तसं यश मिळालं आहे.
advertisement
3/9
अभिनय करता करता ती 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या शोची अँकर झाली. हा शो करत असताना प्राजक्ताने तिच्या दागिन्यांचा ब्रँड सुरू केला. 'प्राजक्तराज' असं तिच्या ब्रँडचं नाव आहे.
advertisement
4/9
प्राजक्ता तिच्या भावाच्या लग्नाला गेली होती. लग्नात तिला महाराष्ट्रीयन दागिने परिधान करायचे होते मात्र ते कुठेही उपलब्ध होत नव्हते. मग प्राजक्ताने स्वतः हे दागिने घडवण्याचा चंग बांधला.
advertisement
5/9
संपूर्ण महाराष्ट्रात फिरून, रिसर्च करून प्राजक्ताने 'प्राजक्तराज'मधून अस्सल महाराष्ट्रीयन दागिने भेटीला आणले. एकीकडे दागिन्यांचा ब्रँड लोकप्रिय होत असताना वर्षभरात प्राजक्ता इतकी मालामाल झाली की तिने स्वतःचं आलिशान फार्महाऊस खरेदी केलं.
advertisement
6/9
कर्जत येथे निसर्गाच्या सान्निध्यात प्राजक्ताने तिचा 'प्राजक्त कुंज' हा फार्महाऊस खरेदी केला आहे. एकाचवेळी इथे 15-20 माणसं राहू शकतात. प्राजक्ता या फार्महाऊसद्वारे तगडी कमाई करते.
advertisement
7/9
प्राजक्ता माळीचा फार्महाऊस म्हणजेच 3 BHK व्हिला आहे. कर्जतमधल गौळवाडी गावात हा असून फार्महाऊसमध्ये 3 बेडरूम्स, हॉल, किचन, स्विमिंगपूल आहे.
advertisement
8/9
प्राजक्ताच्या या फार्महाऊसमध्ये विकेंडला म्हणजेच शनिवार-रविवारी जायचं असेल तर दिवसाचं भाडं हे 30 हजार रुपये आहे. तर सोमवार ते शुक्रवार दरम्यान एका दिवसाचं भाडं 17 ते 20 हजार रुपये आहे.
advertisement
9/9
प्राजक्ताचं हे फार्महाउस आधुनिक सोयींनी सुसज्ज आहे. प्राजक्ताच्या या फार्महाऊसवर 2 दिवस राहायला जाण्याचा विचार करत असाल तर खिशाला चांगलीच कात्री लागू शकते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
भावाच्या लग्नात सुचली बिझनेसची आयडिया, वर्षभरात मालामाल, प्राजक्ताच्या फार्महाऊसचं 1 दिवसाचं भाडं किती?