'खऱ्या ल्यारीमध्ये आला असता तर जीवंत सोडलं नसतं', Dhurandhar 2 मध्ये स्वतःचं पात्र पाहून भडकला पाकिस्तानी नेता
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Dhurandhar 2 Collection: धुरंधरमध्ये भारत-पाकिस्तानमधील काही सत्य घटनांचा आधार घेत गोष्ट पुढे नेण्यात आली आहे. पाकिस्तानातील काही खऱ्या पात्रांचा संदर्भही यामध्ये देण्यात आला आहे. अशातच पाकिस्तानातील एका बड्या राजकारण्याने या फिल्मवर आक्षेप नोंदवला आहे.
advertisement
1/10

आदित्य धर दिग्दर्शित आणि रणवीर सिंगची मुख्य भूमिका असलेल्या 'धुरंधर २' ने सध्या बॉक्स ऑफिसवर वादळ आणलंय. पण या फिल्मची जितकी चर्चा आपल्या देशात होत आहे, तितकीच आपला शेजारी देश पाकिस्तानातही होत आहे.
advertisement
2/10
धुरंधरमध्ये भारत-पाकिस्तानमधील काही सत्य घटनांचा आधार घेत गोष्ट पुढे नेण्यात आली आहे. पाकिस्तानातील काही खऱ्या पात्रांचा संदर्भही यामध्ये देण्यात आला आहे. अशातच पाकिस्तानातील एका बड्या राजकारण्याने या फिल्मवर आक्षेप नोंदवला आहे.
advertisement
3/10
चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते राकेश बेदी यांनी साकारलेली 'जमीला जमाली' ही भूमिका पाहून पाकिस्तानी राजकारणी नबील गबोल प्रचंड संतापले असून त्यांनी या पात्रावरून भारतीय चित्रपट निर्मात्यांवर तोफ डागली आहे.
advertisement
4/10
नबील गबोल यांनी एका मुलाखतीत असा दावा केला आहे की धुरंधरमधील जमील जमालीचं पात्र पूर्णपणे त्यांच्यावर आधारित आहे. गबोल म्हणाले की, चित्रपटात जमील जमालीच्या नावाखाली 'MNA 2007' असं लिहिलं आहे. योगायोगाने २००७ मध्ये त्याच भागातून नबील गबोल स्वतः खासदार होते.
advertisement
5/10
नबील यांनी असाही आरोप केला की, निर्मात्यांनी मानहानीच्या भीतीने त्यांचं खरं नाव वापरलं नाही. त्यांनी म्हटलंय, "ज्या व्यक्ती आज हयात नाहीत त्यांची खरी नावं चित्रपटात आहेत, पण मी जिवंत असल्याने माझं नाव बदलून 'जमील जमाली' करण्यात आलं."
advertisement
6/10
चित्रपटात जमील जमालीला एक घाबरट, चापलूस आणि सत्तेसाठी लाचार असलेला नेता दाखवण्यात आलं आहे. या पात्राच्या मांडणीवरून नबील यांनी संताप व्यक्त केला. ते म्हणाले की, "चित्रपटात मला डरपोक दाखवलंय, पण मी खऱ्या आयुष्यात एक दबंग नेता आहे. माझी प्रतिमा एक कणखर आणि प्रभावशाली नेता म्हणून आहे, जी या फिल्ममध्ये पूर्णपणे चुकीच्या पद्धतीने रंगवली गेली आहे."
advertisement
7/10
इतकंच नाही, तर नबील यांनी चित्रपटातील इतर तांत्रिक बाबींवरही नाराजी व्यक्त केली. त्यांनी म्हटलंय की, कराचीच्या 'ल्यारी' भागात बलुच लोकांची वस्ती जास्त आहे, तिथे लोक पंजाबी बोलत नाहीत. पण चित्रपटात सर्रास पंजाबी भाषेचा वापर झाला आहे, जो वास्तवाला धरून नाही.
advertisement
8/10
त्यांनी आणखी एक मुद्दा मांडला, ज्यात त्यांनी म्हटलंय की, ल्यारीला दहशतवादाचा गड दाखवणं चुकीचं आहे. कराचीच्या इतर भागांच्या तुलनेत तिथे गुन्हेगारी कमी आहे. दरम्यान, नबील यांच्या या दाव्यांवरून सोशल मीडियावर त्यांना ट्रोल केलं जात आहे.
advertisement
9/10
नेटकऱ्यांनी नबील यांची फिरकी घेत म्हटलंय, 'धुरंधर १' रिलीज झाला तेव्हा हेच गबोल अभिमानाने सांगत होते की, जमील जमालीचं पात्र माझ्यावर आहे. आता 'धुरंधर २' मध्ये त्या पात्राची फजिती होताना पाहून ते "मी हा नाहीच" असं म्हणू लागले आहेत.
advertisement
10/10
विशेष म्हणजे, स्वतः राकेश बेदी यांनी 'न्यूज १८' ला दिलेल्या मुलाखतीत आधीच सांगितलं होतं की, धुरंधर २ मध्ये माझ्या पात्राचा जो शेवट आहे, तो पाहून तो माणूस (गबोल) ओरडून सांगेल की- 'नाही, नाही... हा मी नाहीये. मी असा अजिबात नाही.'<span style="font-size: 20px;"> </span>
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
'खऱ्या ल्यारीमध्ये आला असता तर जीवंत सोडलं नसतं', Dhurandhar 2 मध्ये स्वतःचं पात्र पाहून भडकला पाकिस्तानी नेता