रश्मिका की विजय, कोण आहे सगळ्यात श्रीमंत? उदयपूरमध्ये शाही लग्नासाठी लावलेत बक्कळ पैसे
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Rashmika Mandanna-Vijay Deverakonda Net Worth : साऊथ अभिनेता विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. त्यांचे चाहते त्यांना पती-पत्नी म्हणून पाहण्यास उत्सुक आहेत. 26 फेब्रुवारी रोजी उदयपूरमध्ये दोघे सात फेरे घेऊन आयुष्यभरासाठी एकत्र येणार आहेत. दोघांनी लग्नासाठी कोटी रुपये खर्च केल्याचं बोललं जात आहे. दोघांची संपत्ती किती आहे? संपत्तीच्या बाबतीत कोणाची संपत्ती सर्वात जास्त आहे?
advertisement
1/8

विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना यांच्या लग्नाची तयारी मोठ्या थाटामाटात सुरू आहे. या लग्नासाठी उदयपूरमध्ये विशेष व्यवस्था केल्या जात आहेत. उदयपूरमध्ये होणाऱ्या या भव्य लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
advertisement
2/8
4 मार्च रोजी हैदराबादमध्ये दोघांनी ग्रँड रिसेप्शन पार्टी देखील आयोजित केली आहे. आयटीसी हॉटेल्सच्या मेमेंटोसच्या वेबसाइटनुसार, पाहुण्यांच्या राहण्याची व्यवस्था पाहून एका रात्रीच्या राहण्याचा खर्च सुमारे 35,499 इतका आहे.
advertisement
3/8
रश्मिका ही अभिनय क्षेत्रातील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. 2026 च्या सुरुवातीला तिची एकूण संपत्ती सुमारे 66 कोटी इतकी होती. चित्रपटांव्यतिरिक्त ती ब्रँड एंडोर्समेंट आणि इनव्हेस्टमेंटमधूनही खूप पैसे कमावते.
advertisement
4/8
मिंटच्या वृत्तांनुसार, रश्मिका एका चित्रपटासाठी 4 कोटी ते 8 कोटी इतकी फी घेते. परंतु हे सर्व चित्रपटावर अवलंबून असते; जर ती मोठ्या चित्रपटांमध्ये काम करत असेल तर ती त्यानुसार तिचे पैसे ठरवते.
advertisement
5/8
याव्यतिरिक्त रश्मिका दागिने, ड्रिंक्स, ब्युटी आणि ई-कॉमर्समधील अनेक ब्रँडसोबत देखील काम करते. शिवाय ती ब्युटी ब्रँड प्लममध्ये गुंतवणूकदार आहे. तिच्या चित्रपट कमाईव्यतिरिक्त इतरही अनेक प्रोजेक्ट्स आहेत.
advertisement
6/8
तिच्याकडे मुंबई, हैदराबाद, गोवा, कुर्ग आणि बेंगळुरू येथे घरे आहेत. बेंगळुरूमधील घराची किंमत सुमारे 8 कोटी असल्याचे सांगितले जाते. तिच्या कार कलेक्शनमध्ये ऑडी Q3, रेंज रोव्हर स्पोर्ट आणि मर्सिडीज-बेंझ सी-क्लास सारख्या लक्झरी गाड्यांचा समावेश आहे.
advertisement
7/8
दुसरीकडे विजय देवेराकोंडाची संपत्ती देखील रश्मिकाच्या बरोबरीची आहे. अहवालानुसार अभिनेत्याची एकूण संपत्ती 66 ते 70 कोटी दरम्यान आहे. चित्रपटांबद्दल बोलायचे झाले तर तो एका चित्रपटासाठी 12 ते 15 कोटी रुपये घेतो. तो त्याच्या कपड्यांच्या ब्रँड 'राउडी' मधूनही दरवर्षी 5 ते 8 कोटी रुपये कमावतो. त्याची रिअल इस्टेट आणि इतर व्यवसायांमध्येही मोठी गुंतवणूक आहे.
advertisement
8/8
एवढेच नाही तर तो एका इंस्टाग्राम पोस्टसाठी सुमारे 40 लाख रुपये घेतो. हैदराबादमधील ज्युबिली हिल्समध्ये त्याचं घर आहे ज्याची किंमत सुमारे 15 कोटी रुपये आहे. अहवालांनुसार त्याच्याकडे 30 कोटी रुपयांचे खाजगी जेट आहे. त्याच्याकडे अनेक महागड्या गाड्या आहेत ज्यात बीएमडब्ल्यू 5 सिरीज, फोर्ड मस्टँग आणि व्होल्वो एक्ससी 90 यांचा समावेश आहे. दोघांची एकूण संपत्ती 130 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
रश्मिका की विजय, कोण आहे सगळ्यात श्रीमंत? उदयपूरमध्ये शाही लग्नासाठी लावलेत बक्कळ पैसे