TRENDING:

OTT Trending : ओटीटीवर तुफान हसवतेय ही फिल्म, 3 महिन्यांपासून ट्रेंडमध्ये; तुम्ही पाहिली की नाही?

Last Updated:
OTT Comedy Film Trending : ओटीटीवर बऱ्याच कॉमेडी फिल्म्स आहेत. पण एक कॉमेडी फिल्म जी इतकी ट्रेंडिंग आहे की गेल्या पाच महिन्यांपासून टॉप 10 मध्येच आहे. 
advertisement
1/5
OTTवर तुफान हसवतेय ही फिल्म, 5 महिन्यांपासून ट्रेंडमध्ये; तुम्ही पाहिली की नाही?
ओटीटी </a>प्लॅटफॉर्मवर त्याला चांगला प्रतिसाद मिळाला." width="1600" height="900" /> 2025 साली थिएटरमध्ये प्रदर्शित झालेली 2 तास 37 मिनिटांची ही फिल्म. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये ही फिल्म थिएटरमध्ये प्रदर्शित झाली होती. बॉक्स ऑफिसवर कमाईच्या बाबतीत मागे पडली. रिपोर्टनुसार 120 कोटी बजेट असलेल्या या फिल्मने फक्त 117 कोटींची कमाई केली. पण ओटीटी प्लॅटफॉर्मवर त्याला चांगला प्रतिसाद मिळाला.
advertisement
2/5
ही फिल्म म्हणजे एक कायदेशीर कॉमेडी ड्रामा आहे. जो कोर्टरूममध्ये एकमेकांविरुद्ध उभे असलेल्या दोन वकिलांभोवती फिरतो.
advertisement
3/5
चित्रपटाची कथा भट्टा परसौल येथील निषेधांवर आधारित आहे. ही कथा एक मेरठ येथील जगदीश त्यागी आणि कानपूर येथील जगदीश्वर मिश्रा या दोन 'जॉली' वकिलांभोवती फिरते. जे दिल्लीत वकील म्हणून काम करतात. त्यांचं समान टोपणनाव त्यांच्यात सतत संघर्ष आणि व्यावसायिक स्पर्धा निर्माण करतात.
advertisement
4/5
एव्हाना तुम्हाला समजलं असेलच ही फिल्म आहे जॉली एलएलबी 3. यात अक्षय कुमार आणि अर्शद वारसी आहे. दोघांनी अनुक्रमे जगदीश्वर मिश्रा, जगदीश त्यागी वकिलांची भूमिका केली आहे. अक्षय आणि अर्शद व्यतिरिक्त या चित्रपटात हुमा कुरेशी, अमृता राव, सौरभ शुक्ला, सीमा बिस्वास, गजराज राव आणि राम कपूर यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.
advertisement
5/5
सत्य घटनांनी प्रेरित ही फिल्म तुम्हाला हसवेल आणि समाजातील वास्तवही उलगडेल. तुम्हीसुद्धा ही फिल्म थिएटरला पाहिली नसेल, या फिल्ममध्ये नेमकं काय आहे, ते पाहायचं असेल तर तुम्ही ती नेटफ्लिक्सवर पाहू शकता.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
OTT Trending : ओटीटीवर तुफान हसवतेय ही फिल्म, 3 महिन्यांपासून ट्रेंडमध्ये; तुम्ही पाहिली की नाही?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल