TRENDING:

सलमान खान रावण, घमंडी; प्रसिद्ध दिग्दर्शकाचे भाईजानवर गंभीर आरोप, शाहरुखलाही सोडलं नाही

Last Updated:
Salman Khan : सलमान खानवर पुन्हा एकदा एका प्रसिद्ध दिग्दर्शकाने गंभीर आरोप केले आहेत. सलमान रावण आणि घमंडी असल्याची त्यांनी म्हटलं आहे.
advertisement
1/6
सलमान खान रावण, घमंडी; प्रसिद्ध दिग्दर्शकाचे भाईजानवर गंभीर आरोप
'दबंग'चे दिग्दर्शक अभिनव कश्यप अनेकदा बॉलिवूडकरांवर आरोप करताना दिसून येतात. आता पुन्हा एकदा त्यांना सलमानसोबतचा वाद उखडून काढला आहे. सलमान खान रावण आणि घमंडी असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
advertisement
2/6
सलमान खानवर आरोप करत अभिनव कश्यप म्हणाला,"स्वत:ला सुपरस्टार समजून कोणीही सुपरस्टार होत नाही. सलमान खान रावण आहे. तो घमंडी आहे. खरंतर तो रावणपेक्षाही जास्त घमंडी आहे. सलमानबद्दल मी जेव्हा असं म्हणालो तेव्हा लोकांनीही मला दुजोरा दिला. सलमान गेल्या 33 वर्षांपासून स्वत:च कौतुक करत आहे. विशेष म्हणजे या कौतुकासाठी तो पात्रदेखील नाही".
advertisement
3/6
अभिनव कश्यपने अनेकदा सलमान खानबद्दलची नाराजी व्यक्त केली आहे. अभिनवने अनेकदा दावा केला आहे की 'दबंग 2'मधून मला बाहेर काढण्यात आलं आणि जाणूनबुजून माझं करिअर बर्बाद करण्यात आलं".
advertisement
4/6
अभिनवचा आरोप आहे की, सलमान खान आणि त्याचे भाऊ अरबाज आणि सोहेल खान यांनी फक्त माझे प्रोजेक्ट थांबवले नाहीत तर मानसिकरित्यादेखील त्याला त्रास देण्याचा प्रयत्न केला. सलमान खानमुळे त्यांचं करिअर थांबलं, मानसिक स्वास्थ्य बिघडलं आणि 2017 मध्ये त्यांचा घटस्फोटदेखील झाला.
advertisement
5/6
अभिनव कश्यपने सलमानवर गंभीर आरोप केलाय की, सलमानने त्याला आणि त्याच्या कुटुंबियांना धमक्या दिल्या. पण पोलिसांत तक्रार दाखल करण्यात मनाई केली.
advertisement
6/6
सलमान खान आणि अभिनव कश्यप यांच्या नात्यात 'दबंग'च्या यशानंतर दुरावा आला जेव्हा दिग्दर्शकाने 'दबंग 2'साठी नकार दिला होता. त्यानंतर दोघांमधील वाद समोर यायला सुरुवात झाली.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
सलमान खान रावण, घमंडी; प्रसिद्ध दिग्दर्शकाचे भाईजानवर गंभीर आरोप, शाहरुखलाही सोडलं नाही
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल