IPL 2025 : 'झिंटाची टीम जिंकली का?' RCB vs PBKS फायनलच्या आधीच सलमान खानचं ट्वीट व्हायरल
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Salman Khan : RCB vs PBKS च्या IPL 2025 च्या फायनल आधीच सलमान खानचं एक ट्विट व्हायरल झालंय. काय आहे त्याचं ट्विट ?
advertisement
1/7

अभिनेत्री प्रीति झिंटाची टीम पंजाब किंग्ज IPL फायनल 2025मध्ये पोहोचली आहे. सगळ्यांना आता फायनलची आतुरता लागून आहे.
advertisement
2/7
दरम्यान सलमान खानचं ट्विट व्हायरल होत आहे. ज्यात त्यानं लिहिलंय, 'झिंटाची टीम जिंकली का'? सलमानचं हे ट्विट चांगलंच व्हायरल झालं आहे. सलमानचं हे ट्विट नेमकं काय आहे पाहूयात.
advertisement
3/7
तब्बल 11 वर्षांनी प्रीती झिंटाच्या पंजाब किंग्ज टीमने मुंबई इंडियन्सवर विजय मिळवत IPL फायनल 2025 मध्ये प्रवेश केला आहे.
advertisement
4/7
बॉलिवूड अभिनेता सलमान खानचं व्हायरल होणार ट्विट हे 11 वर्ष जुनं आहे. हे ट्विट IPL 2025 च्या फायनल सामन्यापूर्वी पुन्हा चर्चेत आलं आहे.
advertisement
5/7
हे ट्विट सलमान खानने 2014 मध्ये केलं होतं. ज्यामध्ये त्याने विचारलं होतं, "झिंटाची टीम जिंकली का?"
advertisement
6/7
हे ट्विट व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी यावर कमेंटचा वर्षाव केला आहे. सोशल मीडिया वापरकर्त्यांनी मीम्स, रिप्लाय आणि मजेशीर कमेंट्स शेअर केल्या आहेत. भाईजानला फायनलला बोलवा असं अनेकांनी म्हटलं आहे.
advertisement
7/7
प्रीती झिंटा गेल्या अनेक वर्षांपासून PBKS संघाची को ओनर आहे. तिच्या टीमने अनेक चढ-उतार पाहिलेत पण 2025 मध्ये अखेर फायनलमध्ये पोहोचून चाहत्यांची इच्छा पूर्ण केली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
IPL 2025 : 'झिंटाची टीम जिंकली का?' RCB vs PBKS फायनलच्या आधीच सलमान खानचं ट्वीट व्हायरल