Cleaning Fruits : तुम्हाला माहितीये? स्ट्रॉबेरीवर वापरतात सर्वात जास्त कीटकनाशक! तज्ज्ञांनी सांगितले क्लीनिंग हॅक..
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
Right Way To Clean Fruits At Home : स्ट्रॉबेरी, ब्लूबेरी आणि रास्पबेरी सारखी फळं चवीलाच तर उत्तम असतातच, त्याचसोबत आरोग्यासाठीही चांगली असतात. म्हणूनच त्यांना 'सुपरफूड' देखील मानले जाते. मात्र तुम्हाला त्यांना स्वच्छ करण्याचा योग्य मार्ग माहित नसेल तर ही निरोगी फळं उलट परिणाम करू शकतात. आज आम्ही तुम्हाला हि फळं स्वच्छ करण्याचा योग्य मार्ग सांगणार आहोत.
advertisement
1/9

या फळांमध्ये व्हिटॅमिन सी, अँटीऑक्सिडंट्स आणि फायबर भरपूर असतात, जे रक्तातील साखर, कोलेस्टेरॉल आणि पचन नियंत्रित करण्यासाठी उत्तम असतात.
advertisement
2/9
प्रसिद्ध तज्ज्ञ डॉ. मायरो फिगुरा यांनी अलीकडेच काही आश्चर्यकारक माहिती शेअर केली. त्यांनी स्पष्ट केले की बेरी, विशेषतः स्ट्रॉबेरीवर सर्वात जास्त कीटकनाशकं वापरली जातात.
advertisement
3/9
फक्त पाण्याने धुणं पुरेसं नाही : बेरी माती, दूषित पाणी आणि शेतातून स्टोअर शेल्फवर जाताना अनेक लोकांच्या हातातून जातात. डॉ. फिगुरा यांच्या मते, स्ट्रॉबेरी 'डर्टी डझन' फळांपैकी एक आहेत, ज्यामध्ये कीटकनाशकांचे अवशेष सर्वाधिक असतात. साधे पाणी ही रसायने आणि लपलेले बॅक्टेरिया पूर्णपणे काढून टाकत नाही.
advertisement
4/9
बेकिंग सोडा वापरा : डॉ. फिगुरा यांनी मॅसॅच्युसेट्स विद्यापीठाच्या एका अभ्यासाचा हवाला देत स्पष्ट केले की 1% बेकिंग सोडा द्रावण जंतूंना मारू शकते. यासाठी प्रथम एका मोठ्या भांड्यात 2 कप पाणी भरा. त्यात 1 चमचा बेकिंग सोडा घाला. या द्रावणात बेरी 12 ते 15 मिनिटे भिजवा. नंतर ते ताज्या पाण्याने स्वच्छ धुवा.
advertisement
5/9
व्हिनेगर वापरा : तुमच्याकडे बेकिंग सोडा नसेल, तर तुम्ही पांढरा व्हिनेगर देखील वापरू शकता. 1 चमचा व्हिनेगर 2 कप पाण्यात मिसळा, बेरी 5 मिनिटे भिजवा आणि नंतर स्वच्छ धुवा.
advertisement
6/9
या फळे आणि भाज्यांवर देखील लक्ष ठेवा : इंस्टाग्रामवर एका डॉक्टरने कीटकनाशकांचा सर्वाधिक धोका असलेल्या फळं आणि भाज्यांची यादी प्रसिद्ध केली आहे. यामध्ये पालक, केल, द्राक्षे, सफरचंद, नाशपाती, पीच, चेरी, आणि बटाटे यांचा समावेश आहे.
advertisement
7/9
स्ट्रॉबेरीसाठी एक खास टीप : तुम्ही स्ट्रॉबेरी खाणार नाही तोपर्यंत त्यातील कॅलिक्स काढू नका असा सल्ला डॉक्टर देतात. ते लवकर काढून टाकल्याने स्ट्रॉबेरी पाणी शोषून घेऊ शकते आणि तिची चव खराब होऊ शकते. खातानाच हा भाग काढून टाकणे चांगले. कारण येथेच कीटकनाशके जमा होतात.
advertisement
8/9
लक्षात ठेवा की, फळे खाणे हे चांगल्या आरोग्यासाठी आवश्यक आहे. परंतु योग्य स्वच्छता न केल्यास ते हानिकारक ठरू शकतात. पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही बेरी खाण्यापूर्वी धुवाल, तेव्हा डॉक्टरांचा हा 'क्लीनिंग हॅक' लक्षात ठेवा.
advertisement
9/9
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि आरोग्याशी संबंधित सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून, डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच काहीही वापरा. त्याच्या वापरामुळे होणाऱ्या कोणत्याही नुकसानासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Cleaning Fruits : तुम्हाला माहितीये? स्ट्रॉबेरीवर वापरतात सर्वात जास्त कीटकनाशक! तज्ज्ञांनी सांगितले क्लीनिंग हॅक..