भिवंडीत पेपर रोलच्या गोदामाला भीषण आग, चार गोदाम जळून खाक, हादरवणारे फोटो
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
भिवंडीतील मानकोलीस्थित हरिहर कम्पाऊंडमधील ए-२ या इमारतीला भीषण आग लागली असून जवळपास तीन ते चार दुकाने जळून खाक झाली आहेत.
advertisement
1/5

भिवंडी तालुक्यातील मानकोली येथील हरिहर कंपाऊंड परिसरात गादी आणि पेपर रोलच्या गोदामाला भीषण आग लागली आहे.
advertisement
2/5
A-2 या दोन मजली इमारतीत बॉम्बे ट्रॉफी नावाची कंपनी गाद्या आणि कागदी रोल बनवत होती. तर शेजारच्या दुसऱ्या इमारतीत, खेळण्याचे पत्ते बनविण्याचा कारखाना होता.
advertisement
3/5
आगीत तीन ते चार गोदाम जळून खाक झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. आगीची तीव्रता एवढी होती की काही क्षणात दुकानातील माल जळून खाक झाला आहे.
advertisement
4/5
शॉर्टसर्किटने आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळत असली तरी आगीचे खरे कारण अद्याप समोर येऊ शकलेले नाही.
advertisement
5/5
पहिला मजला आणि दुसरा मजला आगीच्या भक्ष्य स्थानी सापडला आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी भिवंडी अग्निशमन दलाच्या तीन गाड्या दाखल झाल्या आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/
भिवंडीत पेपर रोलच्या गोदामाला भीषण आग, चार गोदाम जळून खाक, हादरवणारे फोटो