Weekly Horoscope: धनु, मकर, कुंभ, मीन राशींचे साप्ताहिक राशीफळ; अडचणींना पुरुन उरणार, लढण्याचं बळ
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Weekly Horoscope: फेब्रुवारी 2026 महिन्याचा नवा आठवडा ग्रह-नक्षत्रांच्या स्थितीनुसार विशेष असणार आहे. काही राशींसाठी सुखाचा, तर काहींसाठी धावपळीचा ठरणार आहे. या आठवड्यात कुंभ राशीमध्ये सूर्य, बुध आणि शुक्र यांची युती होत असल्याने शुक्रादित्य आणि त्रिग्रही सारखे शुभ योग तयार होत आहेत. 9 ते 15 फेब्रुवारी या कालावधीत धनु, मकर, कुंभ, मीन राशींचे साप्ताहिक राशीभविष्य जाणून घेऊ.
advertisement
1/6

धनू - धनू राशीवर शनीच्या अडीचकीचा प्रभाव असल्याने हा आठवडा संमिश्र राहील. आठवड्याच्या सुरुवातीलाच खर्चात वाढ आणि आरोग्याच्या समस्या जाणवू शकतात. बाहेरचे खाणे टाळा, कारण पोटाचे विकार होण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी काही मोठे निर्णय घेऊ शकता. धार्मिक कार्यात सहभागी झाल्यामुळे मनाला शांती मिळेल.
advertisement
2/6
मकर - मकर राशीसाठी हा आठवडा खूपच उत्साहाचा आहे. तुमचा राशी स्वामी शनी शुभ स्थितीत आहे. याशिवाय राशीत मंगळ आणि सूर्याची उपस्थिती असल्याने अनेक क्षेत्रांतून लाभ मिळतील.
advertisement
3/6
मकर राशीच्या नोकरी करणाऱ्यांना प्रमोशन किंवा नवीन चांगल्या नोकरीची संधी मिळू शकते. व्यापाऱ्यांना मोठा नफा मिळण्याचे आणि व्यवसायाचा विस्तार होण्याचे संकेत आहेत.
advertisement
4/6
कुंभ - कुंभ राशीवर शनीच्या साडेसातीचा प्रभाव असल्याने काही कामात यश मिळेल तर काही ठिकाणी अडथळे येतील. या आठवड्यात तुमच्या राशीत तीन ग्रहांची युती होत आहे.
advertisement
5/6
कुंभ राशीच्या लोकांना आरोग्यासाठी हा काळ थोडा कठीण असून डॉक्टरांच्या वाऱ्या वाढू शकतात. खर्चावर नियंत्रण ठेवणे कठीण जाईल. मात्र, ऑफिसमधील वातावरण तुमच्या मनाप्रमाणे असेल.
advertisement
6/6
मीन - मीन राशीसाठी हा आठवडा सामान्य राहील. शनीच्या साडेसातीमुळे प्रवासात काही अडचणी किंवा आरोग्याचे प्रश्न उद्भवू शकतात. जुन्या मित्रांशी भेट होईल, पण पैशांची देवाणघेवाण टाळा, अन्यथा नुकसान होऊ शकते. विद्यार्थी अभ्यासाऐवजी इतर गोष्टींत वेळ वाया घालवण्याची शक्यता आहे. कौटुंबिक आयुष्य सुखद असेल, पण जोडीदारासोबत लहान-मोठे वाद होऊ शकतात.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Weekly Horoscope: धनु, मकर, कुंभ, मीन राशींचे साप्ताहिक राशीफळ; अडचणींना पुरुन उरणार, लढण्याचं बळ