TRENDING:

जिद्दीनं व्यवसाय उभारला, पण विश्वासू माणसांनीच दगा दिला, तरुणी थेट रुग्णालयात!

Last Updated:

Chhatrapati Sambhajinagar: झिशानचाही फोन लागला नाही. त्यामुळे संशय बळावला आणि तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
छत्रपती संभाजीनगर : जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर गॅस वितरणाचा व्यवसाय उभारला. पण, 28 वर्षीय तरुणीला स्वतःच्या एजन्सीत काम करणाऱ्या दोन विश्वासू माणसांनी दगा दिला. छत्रपती संभाजीनगरमधील सिडको परिसरातील श्री जगदंबा गॅस एजन्सी येथील तब्बल 60 भरलेले आणि 140 रिकामे गॅस सिलिंडर, तसेच वाहनांच्या बॅटऱ्या, किल्ल्या आणि महत्त्वाची कागदपत्रे त्यांनी लंपास केली आहेत. या चोरीतून एकूण 4 लाख 63 हजार रुपयांचा ऐवज गायब झाला असून, या धक्क्याने एजन्सीचालक तरुणीची प्रकृती बिघडल्याची माहिती आहे. या प्रकरणी एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Chhatrapati Sambhajinagar: जिद्दीनं व्यवसाय उभारला, पण विश्वासू माणसांनीच दगा दिला, तरुणी थेट रुग्णालयात!
Chhatrapati Sambhajinagar: जिद्दीनं व्यवसाय उभारला, पण विश्वासू माणसांनीच दगा दिला, तरुणी थेट रुग्णालयात!
advertisement

अय्याज शब्बीर शेख आणि झिशान (दोघेही रा. माणिकनगर, नारेगाव) अशी आरोपींची नावे असून, हे दोघे श्री जगदंबा गॅस एजन्सीत चालक म्हणून काम करत होते. 4 फेब्रुवारी रोजी सकाळी दहाच्या सुमारास काही ग्राहकांनी गॅस सिलिंडर मिळाले नसल्याच्या तक्रारी फोनवरून केल्या. त्यानंतर एजन्सीचालक तरुणीने चालक अय्याज शेख याला फोन केला असता त्याचा मोबाईल बंद होता. झिशानचाही फोन लागला नाही. त्यामुळे संशय बळावला आणि तपासात चोरी झाल्याचे उघडकीस आले.

advertisement

अभ्यासाचं टेन्शन, इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याची रेल्वे पुलावरून उडी, डॉक्टरांनी ‘मृत्यू’ला अडवलं, पाहा काय केलं?

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सोयाबीनच्या दरात मोठी वाढ, तूर आणि कांद्याला आज काय मिळाला भाव? Video
सर्व पहा

अविवाहित असलेल्या या तरुणीने मोठ्या कष्टाने गॅस वितरणाचा व्यवसाय उभा केला होता. मात्र, ज्यांच्यावर तिने गॅस वितरणाची संपूर्ण जबाबदारी सोपवली, त्यांच्याच फसवणुकीमुळे ती पूर्णपणे खचून गेली आहे. चालकांच्या घरी जाऊन चौकशी केली असता ते तेथेही आढळून आले नाहीत. चोरट्यांनी केवळ गॅस सिलिंडरच नाही, तर एजन्सीच्या ट्रक आणि ॲक्टिव्हा वाहनांच्या बॅटऱ्या, वाहनांच्या किल्ल्या, तसेच 4 कोरे डीसी (डिलिव्हरी चलान) बुक्ससुद्धा पळवून नेल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
जिद्दीनं व्यवसाय उभारला, पण विश्वासू माणसांनीच दगा दिला, तरुणी थेट रुग्णालयात!
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल