संभाजीनगर हादरलं! मध्यरात्री घरात घुसून विवाहितेवर अत्याचार, मारहाणीत पतीचा मृत्यू
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या सिल्लोड तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. इथं दोन जणांनी मध्यरात्री घरात घुसून एका विवाहितेसोबत अश्लील कृत्य केलं आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या सिल्लोड तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. इथं दोन जणांनी मध्यरात्री घरात घुसून एका विवाहितेसोबत अश्लील कृत्य केलं आहे. आरोपी पीडितेशी लगट करत असताना मध्ये पडलेल्या पतीला देखील आरोपींनी मारहाण केली. मारहाणीदरम्यान पतीला हृदयविकाराचा झटका येऊन त्यांचा मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना शुक्रवारी रात्री सिल्लोड तालुक्यातील एका गावात घडली. याप्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीवरून सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्रीच्या सुमारास फिर्यादी महिला आपल्या घरी एकटीच होती. याच दरम्यान गावातील दोन नराधम घरामध्ये घुसले. त्यांनी महिलेचा विनयभंग करत तिच्याशी जबरदस्तीने लगट करण्याचा प्रयत्न केला. यावेळी पीडित महिला आरडाओरडा करत असतानाच तिचे पती तिथे पोहोचले.
आपल्या पत्नीवर होत असलेला अत्याचार पाहून पतीने तातडीने पत्नीला आरोपींच्या तावडीतून सोडवण्याचा प्रयत्न केला. या झटापटीदरम्यान, आरोपींनी पतीलाही मारहाण केली. या घटनेमुळे आणि झालेल्या धक्काबुक्कीमुळे महिलेच्या पतीला प्रचंड मानसिक धक्का बसला आणि त्यातच त्यांना हृदयविकाराचा झटका आला. या झटापटीतच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
advertisement
घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. पीडित महिलेने हिंमत एकवटत सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि घडलेल्या प्रकाराची सविस्तर माहिती दिली. महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी दोन्ही आरोपींविरोधात विनयभंग आणि मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. सिल्लोड ग्रामीण पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
Location :
Aurangabad,Maharashtra
First Published :
Apr 05, 2026 1:48 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
संभाजीनगर हादरलं! मध्यरात्री घरात घुसून विवाहितेवर अत्याचार, मारहाणीत पतीचा मृत्यू










