अमेरिकेच्या खेळाडूने मुंबईकरांच मन जिंकलं, भल्याभल्यांना जमलं नाही ते करून दाखवलं
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
या पराभवानंतर अमेरिकेचा हार्ट ब्रेक झाला होता. या हार्टब्रेकनंतर अमेरिकेच्या एका खेळाडूची कृती सगळ्यांचे मन जिंकून गेली होती.
advertisement
1/7

आयसीसी टी20 वर्ल्ड कपमध्ये शनिवारी भारताने अमेरिकेचा 29 धावांनी पराभव केला होता. या विजयासह टीम इंडियाने वर्ल्ड कपमध्ये चांगली सूरूवात केली होती.
advertisement
2/7
पण या पराभवानंतर अमेरिकेचा हार्ट ब्रेक झाला होता. या हार्टब्रेकनंतर अमेरिकेच्या एका खेळाडूची कृती सगळ्यांचे मन जिंकून गेली होती.
advertisement
3/7
अमेरिकेचा हा खेळाडू दुसरा तिसरा कुणी नसून हरमीत सिंह आहे. हरमीत सिंहने आज बोरीवलीच्या दिनेश लाड क्रिकेट फाऊंडेशनला 10 लाख रूपये दान केले होते.
advertisement
4/7
खरं तर सौरभ नेत्रालवकर आणि हरमीत सिंह हे मुंबईचेच खेळाडू आहेत, पण संधी न मिळाल्याने अमेरिकेकडून त्यांना खेळायला सूरूवात केली होती.
advertisement
5/7
पण आज भारतात आल्यावर त्यांनी मातीशी इमान राखत 10 लाख रूपये दान केले होते.त्यामुळे हरमीत सिंहच्या या कृतीची सर्वत्र चर्चा होते आहे.
advertisement
6/7
दरम्यान हरमीत सिंहला वयाच्या नवव्या वर्षी शिवाजी पार्क जिमखान्याने शोधलं होतं.तसेच मुंबईचा माजी डावखूरा फिरकीपट्टू पद्माकर शिवलकर आणि मुंबईचे माजी कोच प्रवीण आमरे सारख्या दिग्गजांनी त्याला प्रशिक्षण दिले होते.हरमीत अंडर 16 आणि अंडर 19 सामन्यात मुंबईचा कर्णधार होता. त्यानंतर त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये शानदार प्रदर्शन केले होते.
advertisement
7/7
त्यानंतर आयपीएल स्पॉट फिक्सिंगचा आरोप आणि मुंबईच्या सिलेक्टर्सनी दुर्लक्षित केल्याने तो अमेरिकेत गेला. तिकडे त्याने उत्कृष्ट खेळी करून अमेरिकेच्या संघात स्थान मिळवलं. त्यानंतर त्याने 2024 आणि आता 2026 चा वर्ल्ड कप खेळते आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
अमेरिकेच्या खेळाडूने मुंबईकरांच मन जिंकलं, भल्याभल्यांना जमलं नाही ते करून दाखवलं