'माझं लग्न झालंय...', सलमान खानने स्वतः सांगितली होती त्याच्या लग्नाची तारीख, म्हणाला...
Last Updated:
Salman Khan on Marriage : बॉलिवूडचा भाईजान अर्थात सलमान खानच्या एका वक्तव्याने सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं असून चाहते हैराण झाले आहेत.
advertisement
1/8

बॉलिवूडचा भाईजान सलमान खानची गणना इंडस्ट्रीतील 'मोस्ट एलिजिबल बॅचलर'च्या यादीत केली जाते. अनेक वर्षांपासून चाहते त्यांच्या लाडक्या सुपरस्टारच्या लग्नाची प्रतीक्षा करत आहेत. अशातच अभिनेत्याने केलेल्या वक्तव्याने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
advertisement
2/8
सलमान खानच्या लग्नाकडे चाहत्यांचं लक्ष लागलं आहे. दरम्यान एका कार्यक्रमात किंग खान अर्थात शाहरुखने त्याला लग्न कधी करणार? असा प्रश्न विचारला.
advertisement
3/8
किंग खानच्या प्रश्नाचं उत्तर देत सलमान म्हणाला,"माझं लग्न झालंय पण हे सिक्रेट आहे". सलमान खानच्या या वक्तव्याने उपस्थित सर्व सेलिब्रिटी हैराण झाले.
advertisement
4/8
शाहरुखने पुढे विचारलं,"काय? तुझं लग्न झालंय?". यावर उत्तर देत सलमान म्हणाला,"त्रास देणाऱ्या मंडळींना आणि लग्नसंदर्भात प्रश्न विचारणाऱ्यांना मी माझं लग्न 18 नोव्हेंबरला झाल्याचं खोटं बोलत आलो आहे".
advertisement
5/8
शाहरुखने सलमानला पुढे आणखी एक प्रश्न विचारला की, तुझं लग्न कुठे झालं आहे? त्यावेळी भाईजानने स्वप्नात असं उत्तर दिलं".
advertisement
6/8
"तू स्वप्नात कोणासोबत लग्नबंधनात अडकला?", असं शाहरुखने विचारलं असता सलमान म्हणाला,"मुलगी माझ्या स्वप्नात येते तेव्हा मला घाबरायला होतं, माझी झोप उडते.. त्यामुळे मला त्या मुलीचा चेहरा नीट आठवत नाही".
advertisement
7/8
सलमान खानच्या आयुष्यात सोमी अली, संगीता बिजलानी, ऐश्वर्या राय, कतरिना कैफ सारख्या अनेक अभिनेत्री आल्या. पण लग्नापर्यंत मात्र गोष्टी पुढे सरकल्या नाहीत.
advertisement
8/8
सलमान खानच्या आगामी प्रोजेक्टची चाहत्यांना आता प्रतीक्षा आहे. 'बॅटल ऑफ गलवान'च्या माध्यमातून लवकरच तो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
'माझं लग्न झालंय...', सलमान खानने स्वतः सांगितली होती त्याच्या लग्नाची तारीख, म्हणाला...