मारुती हायब्रिड कार/एसयूव्ही
भारतातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी, मारुती सुझुकीने २०२६ पर्यंत अनेक नवीन हायब्रिड वाहनांची योजना आखली आहे. मारुती Victoris पासून सुरुवात करून, ही मध्यम आकाराची एसयूव्ही ग्रँड विटाराच्या ११६ बीएचपी, १.५ लिटर मजबूत हायब्रिड पॉवरट्रेनसह येईल. ती २८.६५ किमी प्रति लिटर मायलेज देण्याचा दावा केला जातो, ज्यामुळे ती भारतातील सर्वात इंधन-कार्यक्षम कार बनू शकते. Victoris नंतर fronx hybrid, नवीन जनरेशनची बलेनो हायब्रिड आणि एक हायब्रिड मिनी MPV येईल. तिन्ही मॉडेल्स मारुती सुझुकीच्या इन-हाऊस विकसित हायब्रिड पॉवरट्रेनसह येतील, ज्यामध्ये १.२ लीटर Z-सिरीज पेट्रोल इंजिन आणि ब्रँडची स्वतःची मजबूत हायब्रिड सिस्टम असेल.
advertisement
(GST 2.0: तब्बल 4.48 लाख रुपयांनी स्वस्त झाली Kia मोटर्सची SUV, कंपनीने यादी केली जाहीर)
आगामी काळात लाँच होणाऱ्या हायब्रिड कार/SUV
हायब्रिड कार आणि SUVs | कधी होऊ शकतात लाँच? |
Maruti Victoris | 2025 दिवाळी |
Maruti Fronx हायब्रिड | 2026 |
New Gen Maruti Baleno बलेनो | 2026 |
Maruti Mini MPV | H2, 2026 |
महिंद्रा XUV 3XO हायब्रिड | 2026 |
Honda Elevate Hybrid हायब्रिड | 2026 |
Renault Duster हायब्रिड | 2026 |
Nissan C Segment SUV | H2, 2026 |
महिंद्रा XUV 3XO हायब्रिड
कोडनेम S226, Mahindra XUV 3XO हायब्रिड २०२६ मध्ये लाँच होण्याची शक्यता आहे. ही महिंद्राची पहिली हायब्रिड कार असणार आहे. Mahindra XUV 3XO मध्ये १.२ लीटर टर्बो पेट्रोल इंजिन असेल. या एसयूव्हीमध्ये बाहेरील बाजूस 'हायब्रिड' बॅज आणि इन्स्ट्रुमेंट क्लस्टरमध्ये काही हायब्रिड-विशिष्ट सॉफ्टवेअर अपडेट्स असण्याची शक्यता आहे.
तर Honda एलिव्हेट हायब्रिड होंडा कार्स इंडियाने लाँचच्या वेळी एलिव्हेटसाठी हायब्रिड पॉवरट्रेन सादर करण्याची संधी गमावली. बाजारपेठेतील वाढती मागणी पाहून, कार निर्मात्याने आता मारुती ग्रँड विटारा आणि टोयोटाला आव्हान देण्यासाठी २०२६ मध्ये होंडा एलिव्हेट हायब्रिड लाँच करण्याचा निर्णय घेतला आहे. मध्यम आकाराच्या एसयूव्हीसाठी, होंडा सिटी e:HEV चे अॅटकिन्सन १.५ लिटर पेट्रोल इंजिन वापरू शकते.
रेनॉल्ट आणि निसान हायब्रिड
एसयूव्ही रेनॉल्ट डस्टर पुढील वर्षाच्या सुरुवातीला भारतात कमबॅक करण्यासाठी सज्ज आहे. एसयूव्ही नवीन स्टायलिंग, प्रीमियम इंटीरियर आणि हायब्रिडसह अनेक पॉवरट्रेनसह येईल. तसंच, रेनॉल्ट डस्टर हायब्रिड त्याच्या नियमित पेट्रोल मॉडेल लाँच केल्यानंतर सुमारे ६ महिन्यांनी सादर केले जाईल. जागतिक बाजारपेठेत, डस्टर १४० बीएचपी, १.६ लिटर पेट्रोल-हायब्रिड पॉवरट्रेनसह उपलब्ध आहे.