आल्याची आवक दबावात
राज्याच्या मार्केटमध्ये आज एकूण 130 क्विंटल आल्याची आवक झाली. यापैकी पुणे मार्केटमध्ये 74 क्विंटल सर्वाधिक आवक राहिली. त्यास प्रतीनुसार 3000 ते 4500 रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे बाजारभाव मिळाला. तसेच छत्रपती संभाजीनगर मार्केटमध्ये आवक झालेल्या 27 क्विंटल आल्यास जास्तीत जास्त 5500 रुपये सर्वाधिक सर्वसाधारण बाजारभाव मिळाला.
APMC Market: रविवारी कृषी मार्केट हाललं; मका, कांदा आणि सोयाबीनला किती मिळाला भाव?
advertisement
शेवग्याच्या आवकेत घट
राज्याच्या मार्केटमध्ये आज 25 क्विंटल शेवग्याची आवक झाली. यापैकी छत्रपती संभाजीनगर मार्केटमध्ये सर्वाधिक 15 क्विंटल आवक राहिली. त्यास प्रतीनुसार 7000 ते 10000 रुपये दरम्यान बाजारभाव मिळाला. तसेच पुणे मार्केटमध्ये आवक झालेल्या 10 क्विंटल शेवग्यास 14750 रुपये सर्वात जास्त बाजारभाव मिळाला.
डाळिंबाचे भाव
आज राज्याच्या मार्केटमध्ये 26 क्विंटल डाळिंबाची एकूण आवक झाली. यापैकी 17 क्विंटल सर्वाधिक आवक छत्रपती संभाजीनगर मार्केटमध्ये राहिली. त्यास सर्वसाधारण 4500 रुपये सर्वात कमी बाजारभाव मिळाला. तसेच पुणे मार्केटमध्ये आवक झालेल्या 9 क्विंटल डाळिंबास प्रतीनुसार 15000 रुपये सर्वाधिक बाजारभाव मिळाला.





