advertisement

APMC Market: रविवारी कृषी मार्केट हाललं; मका, कांदा आणि सोयाबीनला किती मिळाला भाव?

Last Updated:

APMC Market: राज्यातील कृषी मार्केटमध्ये मोठ्या घडामोडी दिसत आहेत. रविवारचं मका, कांदा आणि सोयाबीन दरांबाबत अपडेट जाणून घेऊ.

+
APMC

APMC Market: रविवारी कृषी मार्केट हाललं; मका, कांदा आणि सोयाबीनला किती मिळाला भाव?

मुंबई: जानेवारीत राज्यातील हवामानात सातत्याने बदल होत आहेत. अशातच कृषी मार्केटमध्ये देखील मोठ्या उलाढाली घडताना दिसत आहेत. रविवारी, 11 जानेवारी रोजी राज्यातील कृषी मार्केटमध्ये आवक झालेल्या सोयाबीन, कांदा आणि मक्याची आवक आणि बाजारभाव याबाबत महत्त्वाचं अपडेट जाणून घेऊ.
मक्याच्या आवकेत घट
राज्याच्या कृषी मार्केटमध्ये आज एकूण 320 क्विंटल मक्याची आवक झाली. छत्रपती संभाजीनगर मार्केटमध्ये आवक झालेल्या मक्यास प्रतीनुसार कमीत कमी 1600 ते जास्तीत जास्त 1750 रुपये प्रतिक्विंटल बाजार भाव मिळाला.
कांद्याची उच्चांकी आवक
राज्याच्या मार्केटमध्ये 29 हजार 713 क्विंटल कांद्याची एकूण आवक झाली. यापैकी 16 हजार 411 क्विंटल सर्वाधिक आवक पुणे बाजारात झाली. त्यास प्रतीनुसार 1000 ते 2000 रुपयांपर्यंत बाजार भाव मिळाला. तसेच पुणे मार्केटमध्ये आवक झालेल्या 8994 क्विंटल कांद्यास सर्वसाधारण 1600 रुपये सर्वात कमी बाजारभाव मिळाला.
advertisement
सोयाबीनची आवक
राज्याच्या मार्केटमध्ये 463 क्विंटल सोयाबीनची एकूण आवक झाली. यापैकी बुलढाणा मार्केटमध्ये 300 क्विंटल आवक राहिली. त्यास प्रतीनुसार 4400 ते 4900 रुपये प्रतिक्विंटल बाजार भाव मिळाला.
view comments
मराठी बातम्या/कृषी/
APMC Market: रविवारी कृषी मार्केट हाललं; मका, कांदा आणि सोयाबीनला किती मिळाला भाव?
Next Article
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले? नाव ऐकून बसेल आश्चर्याचा धक्का!
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले?
  • भारतीय धडाधड डाऊनलोड करतायत हे App

  • ॲपसाठी उडाली झुंबड

  • नाव वाचून थक्क व्हाल

View All
advertisement