न्यूज अँकर ते इंडस्ट्रीची 'फुलराणी', बॉलिवूड अभिनेत्याशी लग्न अन् अभिनेत्रीच्या आयुष्याचा धक्कादायक शेवट
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Bhakti Barve : मराठी इंडस्ट्रीतील हरहुन्नरी अभिनेत्री जिच्या अभिनयानं इंडस्ट्रीचं एक दशक गाजवलं. अभिनेत्रीचं लग्न बॉलिवूड अभिनेत्याशी झालं अन् तिथून तिच्या आयुष्याला वेगळीच कलाटणी मिळाली.
advertisement
1/7

'ती फुलराणी' म्हटलं की सर्वांच्या डोळ्यासमोर उभी राहते ती म्हणजेच अभिनेत्री भक्ती बर्वे. केवळ मराठीच नाही तर हिंदी आणि गुजराती भाषेतही त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला.
advertisement
2/7
भक्ती बर्वे दुर्दैवानं आज आपल्यात नाही. ही हरहुन्नरी अभिनेत्री फार लवकर जगाचा निरोप घेऊन गेली. त्यांच्या जाण्यानं निर्माण झालेली पोकळी आजवर कोणीही भरून काढू शकलं नाही.
advertisement
3/7
पु.ल. देशपांडे यांनी लिहिलेलं 'ती फुलराणी' हे नाटक भक्ती बर्वे यांनी अजरामर केलं. "तुला शिकवीन चांगलाच धडा, तुझ्या पापाची भरलाय घडा" हे संवाद आजही लोकप्रिय आहेत. या नाटकाचे त्यांनी तब्बल 1111 हून अधिक प्रयोग केले. तसेच 'आई रिटायर होतेय' या नाटकाचे त्यांनी 950 पेक्षा जास्त प्रयोग करून प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं.
advertisement
4/7
भक्ती बर्वे यांचा अभिनय प्रवास बालपणापासूनच सुरू झाला. गणेशोत्सवात छोट्या नकला करत त्यांनी रंगभूमीची ओळख निर्माण केली. शाळेत त्या अभ्यासातही हुशार होत्या. त्याचबरोबर उत्तम पाठांतरामुळे त्यांनी पुढे आकाशवाणी आणि दूरदर्शनवर वृत्तनिवेदिका म्हणून काम केलं.
advertisement
5/7
नाट्यक्षेत्रातील कामगिरीसाठी भक्ती बर्वे यांना 1990 साली संगीत नाटक अकादमी पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. 'अखेरचा सवाल', 'टिळक आणि आगरकर', 'मिठीतून मुठीत', 'रंग माझा वेगळा', 'रातराणी', 'वयं मोठं खोटं' आणि 'ती फुलराणी' ही भक्ती बर्वे यांची काही अजरामर नाटकं आहेत.
advertisement
6/7
भक्ती बर्वे यांच्या आयुष्यात एक वेगळा टप्पा आला जेव्हा त्या बॉलिवूड अभिनेता शफी इनामदार यांच्या प्रेमात पडल्या आणि त्यांच्या आयुष्याला वेगळीच कलाटणी मिळाली. दोघांचं लग्न आणि प्रेमकहाणी इंडस्ट्रीत चर्चेत आली होती. लग्नानंतर काही वर्षात म्हणजेच 1996 साली शफी इनामदार यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं आणि भक्ती बर्वे यांचं आयुष्यच बदललं.
advertisement
7/7
पती शफी इनामदार यांच्या निधनानंतर भक्ती बर्वे पार कोलमडून गेल्या होत्या. पतीच्या निधनाच्या जवळपास 5 वर्षांनी भक्ती बर्वे यांच्यावरही काळाचा मोठा आघात झाला. वाईहून मुंबईला परत येत असताना त्यांचा रस्ते अपघात झाला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. 12 फेब्रुवारी 2001 रोजी मराठी रंगभूमीची ही कसदार अभिनेत्री कायमची निघून गेली.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
न्यूज अँकर ते इंडस्ट्रीची 'फुलराणी', बॉलिवूड अभिनेत्याशी लग्न अन् अभिनेत्रीच्या आयुष्याचा धक्कादायक शेवट