प्रतीक्षा संपली! या दिवशी रिलीज होतोय शाहरुखचा King, रिलीजसाठी निवडलाय खास मुहूर्त
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Shah Rukh Khan King Release Date : शाहरुख खान सध्या आपल्या आगामी 'किंग' या सिनेमामुळे चर्चेत आहे. नुकतीच या सिनेमाची रिलीज डेट समोर आली आहे.
advertisement
1/7

बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान सध्या आपल्या आगामी 'किंग' या सिनेमामुळे चर्चेत आहे. या सिनेमाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. अखेर या बहुप्रतीक्षित फिल्मची रिलीज डेट समोर आली आहे. काही दिवसांपूर्वीच दिग्दर्शकाने रिलीज डेटबाबत हिंट दिली होती.
advertisement
2/7
सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित 'किंग'च्या रिलीज डेटबाबत नवी माहिती समोर आली आहे. सिद्धार्थने काही दिवसांपूर्वी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली होती. यात त्याने 'किंग'च्या रिलीज डेटबाबत हिंट दिली होती. पण आता मिळालेल्या माहितीनुसार, 'किंग' हा सिनेमा क्रिसमसच्या मुहूर्तावर रिलीज होणार आहे.
advertisement
3/7
बॉलिवूड हंगामाच्या रिपोर्टनुसार, शाहरुख खान आणि सिद्धार्थ आनंद 'किंग' हा सिनेमा 4 किंवा 25 डिसेंबरला रिलीज करण्याचा विचार करत आहेत. 'क्रिसमस 2026'मध्ये बॉक्स ऑफिसवर शाहरुख खान धमाका करताना दिसेल.
advertisement
4/7
नितेश तिवारी यांचा 'रामायण' हा सिनेमादेखील सुपरहिट ठरणार आहे. त्यामुळे 'किंग' आणि 'रामायण' हे दोन्ही सिनेमे बॉक्स ऑफिसवर ऐतिहासिक कमाई करताना दिसतील.
advertisement
5/7
'किंग' या चित्रपटात शाहरुख खानसोबत दीपिका पादुकोण, अभिषेक बच्चन, सुहाना खान, रानी मुखर्जी, अरशद वारसी हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.
advertisement
6/7
'पठाण','जवान'नंतर शाहरुखचा 'किंग' हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल. शाहरुखचा आतापर्यंतचा रेकॉर्ड ब्रेक करणारा हा सिनेमा ठरेल.
advertisement
7/7
शाहरुखचे 'दीवाना', 'पठाण', 'चेन्नई एक्सप्रेस', 'दिलवाले', 'रईस', 'मोहब्बतें', 'देवदास' हे सिनेमे आजवर प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरले आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
प्रतीक्षा संपली! या दिवशी रिलीज होतोय शाहरुखचा King, रिलीजसाठी निवडलाय खास मुहूर्त