TRENDING:

वेश्याव्यवसायात झाली अटक; रेस्क्यू होममध्ये घालवले दिवस; आता असं आयुष्य जगतेय ही अभिनेत्री

Last Updated:
चित्रपट जगताला जादुई नगरी असं म्हटलं जातं. या भूलभुलैय्यात दररोज अनेक तरुण-तरुणी नशीब आजमावण्यासाठी येतात. पण येथे एकदा मिळवलेलं यश टिकवणंसुद्धा मोठं आव्हान असतं. इथं केलेली एक चूक संपूर्ण करिअर उद्धवस्त करण्यास पुरेसी ठरते. बालकलाकार म्हणून राष्ट्रीय पुरस्कार मिळवलेली आणि सध्या अभिनेत्री म्हणून स्थिरावण्यासाठी संघर्ष करावा लागणाऱ्या एका अभिनेत्रीच्या बाबतीतही असचं काहीसं घडलं होतं.
advertisement
1/8
वेश्याव्यवसायात झाली अटक; करिअर बर्बाद, आता असं आयुष्य जगतेय ही अभिनेत्री
ही अभिनेत्री म्हणजे श्वेता बसू प्रसाद. तिने 2002 मध्ये 'मकडी' चित्रपटाद्वारे बाल अभिनेत्री म्हणून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. 'कहानी घर घर की' या टीव्ही मालिकेनं तिला घराघरात ओळख मिळवून दिली होती. श्वेता तिच्या कारकिर्दीव्यतिरिक्त अनेकवेळा वादातही अडकली आहे.
advertisement
2/8
श्वेता बसू एक अभिनेत्री असण्यासोबतच श्वेता एक लेखिका, डॉक्युमेंटरी फिल्ममेकर आणि प्रोड्युसर देखील आहे. 11 जानेवारी 1991 रोजी जमशेदपूरमध्ये जन्मलेली श्वेता बसू आपल्या लहानपणी कुटुंबासह मुंबईत आली होती.
advertisement
3/8
शाहरुख खानच्या 'फिर भी दिल है हिंदुस्तानी' या चित्रपटात ही अभिनेत्री पहिल्यांदा दिसली होती. यानंतर तिने 'मकडी' चित्रपटात काम केलं, ज्यासाठी तिला सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचा पुरस्कारही मिळाला होता. पण एका चुकीमुळं श्वेताचं करिअर बरबाद झालं.
advertisement
4/8
श्वेता बसू अभिनेत्री 2014 मध्ये हैदराबादमध्ये सेक्स रॅकेटमध्ये पकडली गेली होती.
advertisement
5/8
मीडिया रिपोर्ट्सनुसार, 2014 मध्ये पोलिसांनी हैदराबादच्या बंजारा हिल्समधील एका हॉटेलवर छापा टाकला होता. तिथून श्वेता प्रसाद बसू हिला वेश्याव्यवसायाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. या अटकेनंतर एकच खळबळ उडाली होती.
advertisement
6/8
या छाप्यात पोलिसांनी एका सहाय्यक संचालकालाही अटक केली होती आणि तो या रॅकेटचा सूत्रधार असल्याचं सांगण्यात आलं होतं. त्यानंतर श्वेताला काही महिन्यांसाठी रेस्क्यू होममध्ये पाठवण्यात आलं होतं.
advertisement
7/8
मात्र रेस्क्यू होममधून परत आल्यानंतर तिनं तिच्यावर लावण्यात आलेले आरोप फेटाळले होते. एका कार्यक्रमानिमित्त मी हैदराबादला गेले होते. माझ्यावर खोटे आरोप लावण्यात आले आहेत, असं ती म्हटली होती. पुढे हैदराबाद पोलिसांनीही श्वेताला क्लीन चिट दिली.
advertisement
8/8
पण या सर्वांचा तिच्या करिअरवर मोठा परिणाम झाला, व तिला चित्रपट क्षेत्रात पुन्हा यशस्वी होण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला.दरम्यान, श्वेतानं पुन्हा नव्यानं अभिनय क्षेत्रातील तिचं करिअर सुरू केलं आहे. ती आता या क्षेत्रात यशस्वीसुद्धा होऊ लागली आहे. परंतु 2014 मध्ये घडलेल्या प्रकरणामुळे तिचं करिअर उद्धवस्त होण्याची वेळ आली होती.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
वेश्याव्यवसायात झाली अटक; रेस्क्यू होममध्ये घालवले दिवस; आता असं आयुष्य जगतेय ही अभिनेत्री
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल