'आधी पोट दाखवायचं, मग बाळाचा चेहरा लपवायचा', सोनम कपूरचं बेबी शॉवर; PHOTO पाहून नेटकऱ्यांनी घेतली शाळा
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Sonam Kapoor Baby Shower : सोनम कपूरच्या दुसऱ्या डोहाळे जेवणात कपूर कुटुंब आणि करीना कपूर, भूमी पेडणेकर, शबाना आझमी उपस्थित होते. सोनमचा लूक चर्चेत असून फोटो व्हायरल झाले आहेत.तर दुसरीकडे सोनमला नेटकऱ्यांनी ट्रोल केलंय.
advertisement
1/8

बॉलीवूड अभिनेत्री सोनम कपूरच्या घरी सध्या आनंदाचे वातावरण आहे. ती दुसऱ्यांदा आई होणार आहे. 8 फेब्रुवारी रोजी तिचं दुसरं डोहाळे जेवण पार पडलं. या खाजगी समारंभात कपूर कुटुंबासह अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी उपस्थित होते.
advertisement
2/8
करीना कपूरपासून ते भूमी पेडणेकरपर्यंत सर्वजण या सेलिब्रेशनचा भाग होते. सोनम कपूरच्या बेबी शॉवरमधील फोटो व्हायरल होत आहेत. एकीकडे सोनमचं कौतुक होतंय तर दुसरीकडे सोनमला ट्रोल देखील करण्यात आलं आहे.
advertisement
3/8
सोनम कपूरचा बेबी शॉवरमधील लूक सर्वांना आवडला आहे. तिने फुलांचं भरतकाम केलेला एक सुंदर लाईम ग्रीन लेहेंगा घातला होता. तिचे केस नीटनेटके बन, हेवी नेकलेस आणि तिच्या लूकला जाणारे कानातले आणि बांगड्या घातल्या होत्या. फोटोंमध्ये सोनमने प्रेमाने तिचा बेबी बंप फ्लांट करताना दिसली. तसंच तिच्या चेहऱ्यावर प्रेग्नंसी ग्लो देखील पाहायला मिळाला.
advertisement
4/8
चुलत बहीण अंशुला कपूरने सोनम आणि आनंद आहुजाचा एक क्यूट फोटो शेअर केला आहे. इतर फोटोंमध्ये ते त्यांचे जवळचे मित्र, डिझायनर संदीप खोसला आणि पेर्निया कुरेशी यांच्यासोबत मजा करताना दिसत आहेत.
advertisement
5/8
सोनम कपूरच्या बेबी शॉवर पार्टीमध्ये शबाना आझमी यांनी हजेरी लावली होती. खुशी कपूर, भूमी पेडणेकर आणि महीप कपूर सारख्या इतर सेलिब्रिटीजही बेबी शॉवरसाठी आल्या होत्या.
advertisement
6/8
दरम्यान सोनमच्या बेबी शॉवरचे फोटो पाहून नेटकऱ्यांनी तिची शाळा घेतली. एका युझरनं लिहिलंय, 'अब सब कुछ दिखा देंगे, बादमे बेबी दिखाने में तकलीफ होती है."
advertisement
7/8
दुसऱ्या युझरनं लिहिलं, "प्रेग्नंसीमध्ये पोट दाखवत फिरते. नंतर बेबीचा चेहरा लपवते." तर काहींनी सोनमच्या ड्रेसिंग सेन्सचं कौतुक केलं.
advertisement
8/8
सोनम कपूरने नोव्हेंबरमध्ये तिच्या दुसऱ्या प्रेग्नंसीची घोषणा केली. सोनम कपूर आणि आनंद आहुजा यांनी 2018 मध्ये लग्न केले. 2022 मध्ये वायु हा मुलगा झाला. आता ते त्यांच्या दुसऱ्या बाळाची वाट पाहत आहेत. नोव्हेंबर 2025 मध्ये सोनमने एका स्टायलिश सोशल मीडिया पोस्टद्वारे तिच्या दुसऱ्या बाळाची घोषणा केली.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
'आधी पोट दाखवायचं, मग बाळाचा चेहरा लपवायचा', सोनम कपूरचं बेबी शॉवर; PHOTO पाहून नेटकऱ्यांनी घेतली शाळा