गावातलं रहस्य अन् टेकडीवर सापडली हादरवून टाकणारी गोष्ट; सस्पेन्सचा बाप आहे 'ही' 10 एपिसोडची सीरिज, OTT वर नंबर 1
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Best Suspense Thriller of 2026: १० एपिसोडची एक अशी वेबसीरिज रिलीज झाली आहे, ज्याने प्रेक्षकांना जवळपास ४०० मिनिटं खिळवून ठेवलं आहे. या सीरिजचा एक-एक सीन तुमच्या अंगावर शहारे आणेल.
advertisement
1/8

सध्या ओटीटीवर चांगल्या वेब सीरिज आणि फिल्मचा जणू काही पूर आला आहे. अशातच १० एपिसोडची एक अशी वेबसीरिज रिलीज झाली आहे, ज्याने प्रेक्षकांना जवळपास ४०० मिनिटं खिळवून ठेवलं आहे. या सीरिजचा एक-एक सीन तुमच्या अंगावर शहारे आणेल.
advertisement
2/8
सध्या नेटफ्लिक्सवर राणी मुखर्जीच्या 'मर्दानी ३' ची हवा असतानाच सुपरस्टार विजय सेतुपति मुख्य भूमिकेत असलेली 'काट्टन' ही १० भागांची सीरिज जिओ हॉटस्टारवर ट्रेंड करतेय. प्रेक्षक अक्षरशः रात्रीची झोप उडवून ही सीरिज पाहत आहेत.
advertisement
3/8
एका छोट्याशा गावातल्या डोंगराळ भागातून 'काट्टन'ची गोष्ट सुरू होते, जिथे एका व्यक्तीचं कापलेलं मुंडकं मिळतं. त्या व्यक्तीचं धड गायब असतं, पण धक्कादायक गोष्ट म्हणजे त्या कापलेल्या मुंडक्याच्या चेहऱ्यावर एक विचित्र हास्य असतं.
advertisement
4/8
हे मुंडकं नेमकं कोणाचं? या प्रश्नाचा शोध घेताना पोलीस 'मुथु' नावाच्या गूढ व्यक्तीपर्यंत म्हणजेच विजय सेतुपतीपर्यंत पोहोचतात. या सीरिजमध्ये ९० च्या दशकापासून २०१७ पर्यंतचा काळ उलगडण्यात आला आहे. गावातल्या लोकांसाठी मुथु कधी रक्षक असतो, तर कधी राक्षस.
advertisement
5/8
सीरिज जशी एक एक एपिसोड पुढे जाते, तसतसे मुथुच्या आयुष्यातील भयानक पैलू जसे जसे समोर येतात. तसाच या सीरिजचा सस्पेन्स अधिक भयंकर होत जातो.
advertisement
6/8
मुथु नक्की कोण होता आणि त्याचं हसतमुख मुंडकं तिथे कसं पोहोचलं? हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला ही डार्क थ्रिलर पहावीच लागेल. ही सीरिज इतकी जबरदस्त आहे की तिला IMDb ने १० पैकी ८.३ इतकी तगडी रेटिंग दिली आहे.
advertisement
7/8
२७ मार्चला रिलीज झालेल्या या सीरिजमध्ये विजय सेतुपतीसह मिलिंद सोमन, सुदेव नायर, वदिवेल मुरुगन आणि रिशा जॅकोब्स यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. एम. मणिकंदन आणि बी. अजितकुमार या जोडीने या सीरिजचं दिग्दर्शन केलं आहे.
advertisement
8/8
जर तुम्हाला 'पाताळ लोक' किंवा 'मिर्झापूर' सारख्या डार्क आणि सस्पेन्सने भरलेल्या सीरिज आवडत असतील, तर 'काट्टन' ही तुमच्यासाठी एक पर्वणीच ठरेल. ग्रामीण भागातील राजकारण, अंधश्रद्धा आणि माणसाचा क्रूर चेहरा या सीरिजमध्ये अतिशय प्रभावीपणे दाखवण्यात आला आहे.<span style="font-size: 20px;"> </span>
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
गावातलं रहस्य अन् टेकडीवर सापडली हादरवून टाकणारी गोष्ट; सस्पेन्सचा बाप आहे 'ही' 10 एपिसोडची सीरिज, OTT वर नंबर 1