Eat Eggs According To Age : वयानुसार बदलतं अंडी खाण्याचं प्रमाण, पाहा तुमच्यासाठी किती खाणं योग्य; स्टडीमध्ये खुलासा
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
Right amount eggs to eat according to age : अंडी आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आणि तितकीच गरजेची असतात. त्यामुळे बरेच लोक आपल्याला आहारात अंडी सामील करतात आणि रोज खातात. पण तुम्हाला माहित आहे, प्रत्येकाच्या वयानुसार त्याने किती अंडी खावी हे प्रमाण सांभाळणं गरजेचं असतं. चला पाहूया आपल्या वयानुसार कोणी किती अंडी खावी.
advertisement
1/9

आपल्या शरीराला सर्व पोषक तत्वांची गरज असते. रोजच्या जेवणातून आपल्याला सर्व पोषण मिळतेच असे नाही, त्यामुळे बऱ्याचदा आपल्याला काही गोष्टी आहारात सामील कराव्या लागतात. अंडीही त्यांपैकीच एक आहे. पण रोज अंडी खाण्याऱ्यांनी नेमकी किती खावी? चला पाहूया.
advertisement
2/9
अंड्यामध्ये उच्च दर्जाचे प्रोटीन असते. तसेच त्यामध्ये जीवनसत्त्वे बी12, डी आणि कोलीन असतात, जे आपल्या मेंदूसाठी चांगले असते. काही लोक एका अंड्याचा पिवळा भाग वाईट मानतात. मात्र हेदेखील आपल्या आरोग्यासाठी चांगले असते.
advertisement
3/9
किती प्रमाणात अंडी खाणं सुरक्षित असतं याबद्दल बोलायचं झालं, तर हेल्थलाइननुसार, एका निरोगी प्रौढाने रोज 1-2 अंडी खाणे योग्य आहेत आणि ते हृदयरोगाचा धोका खूप वाढवत नाहीत.
advertisement
4/9
6-12 महिने वयोगटातील मुलांनी किती अंडी खावी : 6-12 महिने वयोगटातील मुलांना आठवड्यातून 2-4 वेळा अर्धा किंवा एक अंड्याचा पिवळा भाग तुम्ही देऊ शकता. यामुळे अ‍ॅलर्जी टाळण्यास मदत होते आणि कोलीनची आवश्यकता पूर्ण पूर्ण होते.
advertisement
5/9
1-2 वर्षे वयोगटातील मुलांनी किती अंडी खावी : या वयोगटातील मुलं आठवड्यातून 3-4 संपूर्ण अंडी खाऊ शकतात. यामुळे शरीराला चांगले प्रोटीन मिळते आणि वाढीसाठी हे मदत करते. अंड्यांमध्ये व्हिटॅमिन डी देखील असते, त्यामुळे 2 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांना रोज एक अंडे दिल्यास त्यांच्या हाडांच्या विकासास मदत मदत होते.
advertisement
6/9
किशोरवयीन मुलांनी किती अंडी खावी : किशोरवयीन म्हणजेच 2-12 वर्षे वयोगटातील मुले रोज एक अंडे खावे. हे त्यांच्या स्नायूंच्या वाढीसाठी मदत करते. तर 13-19 वयोगटातील सक्रिय किशोरवयीन मुलांनी 1-3 अंडी खाणं योग्य असतं. कारण दोन्ही वयवगटातील मुलांच्या वाढीसाठी प्रोटीन आवश्यक असते.
advertisement
7/9
20-50 वयोगटातील लोकांनी किती अंडी खावी : हेल्थलाइन चाचण्यांनुसार, 20-50 वयोगटातील निरोगी प्रौढ रोज 1-2 संपूर्ण अंडी खाऊ शकतात, ज्यामुळे एचडीएल म्हणजेच चांगले कोलेस्ट्रॉल वाढते.
advertisement
8/9
50 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांनी किती अंडी खावी : अमेरिकन हार्ट असोसिएशनच्या मते, सामान्य कोलेस्ट्रॉल पातळी असलेल्या ५० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांसाठी रोज 1-2 अंडी खाणं सुरक्षित आहेत. योग्य प्रमाणात अंडी खाल्ल्याने वाढत्या वयात स्नायूंचे नुकसान टाळण्यास मदत होते.
advertisement
9/9
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Eat Eggs According To Age : वयानुसार बदलतं अंडी खाण्याचं प्रमाण, पाहा तुमच्यासाठी किती खाणं योग्य; स्टडीमध्ये खुलासा